ब्रिटन, 10 मे : कोरोना काळात आपल्यासमोर साधं कुणी शिंकलं आणि खोकलं (Snizzing and coughing) तरी याला कोरोना नाही ना? अशीच भीती वाटते. लगेच त्या व्यक्तीपासून आपण दूर पळतो जेणेकरून आपल्याला कोरोना होणार नाही. पण ज्या शिंकण्या-खोकण्याची आपणा सर्वांना भीती वाटते, तेच करून एक मॉडेल मात्र लाखो रुपये कमवते आहे (Model get 4 lakh rupees for Snizzing and coughing).
यूकेतील 42 वर्षांची मॉडेल आणि रिअॅलिटी टीव्ही स्टार हॉली मेग्वायर व्हिडीओ कॉलवर शिंकून-खोकूनच भरपूर कमाई करत आहे. तिच्या क्लाइंट्सकडून तिला अशी मागणी येत असल्याचा दावा तिने केला आहेत.
कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकांनी उदरनिर्वाहाचा वेगळा मार्ग शोधला आहे. काही मॉडेल, सेलिब्रिटी सोशल मीडिया, ऑनलाइन वेबसाइट्सचा आधार घेत आहेत. इथे आपले फोटो आणि व्हिडीओज शेअर करत पैसे कमवत आहेत. त्यापैकीच एक आहे हॉली. हॉली एका वेबसाईटवर फेसटाइम सर्व्हिस देते.
हे वाचा - महिलेला मूल जन्माला घालणं वाटते मजा! 16व्या बाळाची आई होताच 17व्या बेबीची तयारी
पण सोशल मीडियावर हॉट आणि बोल्ड फोटो, व्हिडीओजची मागणी असते. अनेकांना अभिनेत्री, सेलिब्रिटी, मॉडेलचे हॉट, बोल्ड, बिकिनी फोटो पाहायला आवडतात. पण कोरोना काळात मात्र हा रोमान्टिक अंदाजही बदलला आहे. लोक विचित्र रोमान्स करू लागले आहेत. पुरुषांना मॉडेलला हॉट आणि बोल्ड फोटो किंवा व्हिडीओत नव्हे तर शिंकताना आणि खोकताना पाहायची आहे.
द सनशी बोलताना हॉलीने सांगितलं, कोरोना काळात क्लाइंट्सकडून आपल्याला विचित्र विचित्र मागण्या येत आहेत. त्यांच्या या अजब मागण्या पूर्ण करायला सांगत आहे. क्लाइंट्स मला कॅमेऱ्यासमोर खोकायला आणि शिंकायला सांगता. कित्येक वेळा 15 ते 20 मिनिटं तिला असंच करावं लागतं. अनेकदा तर शिंकणं आणि खोकणंही अशक्य होतं. मी नेहमी सोबत पेपर शेकर ठेवते, ज्यामध्ये मला शिंकणं सोपं होतं. फक्त शिंकून, खोकून महिनाभरात जवळपास ती 4 लाख रुपये कमवते.
हे वाचा - 'उमलत्या वयातले आघात आयुष्य बदलतात'; अभिनेत्रीने व्यक्त केले धक्कादायक अनुभव
हॉलीने सांगितलं, कोरोना काळात मास्क दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. त्यामुळे अनेकांना मी मास्क घातलेला पाहायला आवडतो. वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या डिझान्सचे मास्क मला घालायला सांगितले जातात, असंही हॉलीने सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Lifestyle, Model, Romance, Uk