Home /News /lifestyle /

प्रेमासाठी वाटेल ते! Dating Apps वर मिळेना जोडीदार; त्याने फेसबुकवरच लावला आपला Sale

प्रेमासाठी वाटेल ते! Dating Apps वर मिळेना जोडीदार; त्याने फेसबुकवरच लावला आपला Sale

10 वर्षे Dating apps वापरूनही जोडीदार मिळाला नाही, अखेर एकटेपणाला कंटाळून 30 वर्षांच्या व्यक्तीने फेसबुकवर (facebook) आपली जाहिरात दिली.

    लंडन, 03 ऑक्टोबर : कोरोनाच्या या परिस्थिती कित्येक जोडीदार एकमेकांपासून दुरावले आहेत. एकटेपणा काय असतो याची जाणीव आता होऊन लागली आहे. कित्येकांनी यादरम्यान सोशल मीडियाचा आधार घेतला. व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज, व्हिडीओ यामार्फत एकमेकांशी जोडलेले राहिले. ज्यांचा कुणी पार्टनर नाही, त्यांनी आपल्यासाठी ऑनलाइन पार्टनर शोधले आणि यासाठी मदत झाली ती डेटिंग अ‍ॅपची. मात्र यूकेतील एका व्यक्तीसाठी हे डेटिंग अ‍ॅप फारसं काही लकी ठरलं नाही. अखेर त्याने डेटिंग अ‍ॅप सोडून फेसबुकवरच आपली जाहिरात दिली. हो. तुम्ही वाचलंत ते अगदी खरं आहे. यूकेतील एका व्यक्तीने एकटेपणाला कंटाळून स्वतःलाच फेसबुकवर सेल केलं. आपली जाहिरात त्याने दिली. एलन क्लेटॉन (Alan Ian Clayton) असं या व्यक्तीचं नाव आहे. 30 वर्षांचा एलन नॉर्थशायरमध्ये राहतो. गेल्या दहा वर्षांपासून तो डेटिंग अॅप्स वापरतो. मात्र त्याला एकही जोडीदार मिळाला नाही, ज्याच्यासह तो आपलं आयुष्य घालवेल. अखेर एकटेपणाला कंटाळलेल्या एलनने फेसबुकवर आपलीच जाहिरात टाकली. हे वाचा - फक्त महिलाराज, पुरुषांना नो एंट्री! मुलालाही अठराव्या वयात काढलं जातं गावाबाहेर "हेलो लेडीज. मी एलन. मी 30 वर्षांचा आहे. मला एक प्रेमळ अशी महिला हवी आहे, जिच्याशी मी बोलेन, जी माझ्यासाठी सर्वकाही असेल, जिच्याशी मी लग्न करेन. मला एकटं राहायचं नाही. मी डेटिंग साइटला कंटाळोल आहे. तिथं माझं काबी नशीब नाही. त्यामुळे मी आता हा मार्ग स्वीकारला आहे", अशा आशयाची पोस्ट त्याने फेसबुकवर टाकली आणि यासह आपले बरेच फोटोही टाकले. त्याची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. हे वाचा - पगार नाही तर फक्त टिपमुळे आजोबा लखपती; Pizza Delivery साठी मिळाली 9 लाख रु. टिप इतकंच नव्हे तर त्याचे वडील फ्रँक यांनीदेखील ही जाहिरात पाहिली. त्यांनाही आश्चर्य वाटलं. मात्र त्यांना त्याची ही कल्पना आवडली. मेट्रोशी बोलताना ते म्हणाले, "तो खूप चांगला आहे. प्रत्येकाला मदत करतो. खूप आज्ञाधारक आहे. आम्ही त्याला जे काही करायला सांगतो ते तो करतो. आम्हाला त्याला आनंदी पाहायचं आहे. तो जेवण बनवू शकतो, भांडी घासू शकतो, कपडे धुवू शकतो. आमच्या कुत्र्यालाही तो वॉकवर घेऊन जातो. तो एक चांगला मामाही आहे. त्याला महिलांनी एकदा तरी संधी द्यायला हवी"
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Partner, Relationship

    पुढील बातम्या