Home /News /lifestyle /

Yuck! तरुणींच्या घाणेरड्या मोज्यांसाठी महिन्याला खर्च करतो 20 हजार रुपये; असा वापर की वाटेल किळस

Yuck! तरुणींच्या घाणेरड्या मोज्यांसाठी महिन्याला खर्च करतो 20 हजार रुपये; असा वापर की वाटेल किळस

फोटो सौजन्य (CANVA)

फोटो सौजन्य (CANVA)

तरुणींचे घाणेरडे मोजे या व्यक्तीला आकर्षित करतात.

    ब्रिटन, 07 सप्टेंबर :  तसं आपण सेकंड हँड वस्तू घेतो त्यात काही नवीन नाही. म्हणजे फक्त वस्तूच नाही तर काही सेलिब्रिटींचे वापरलेले कपडे लोक पैसे देऊन खरेदी करतात, हे आपल्याला माहिती नाही. पण हे कपडे चांगल्या स्थितीत असतात. कधी कुणाचे घाणेरडे कपडे कुणी खरेदी केलेले ऐकलं आहे का? तेसुद्धा मोजे (UK man buys dirty socks of girls). प्रत्येकाला काही ना काही विचित्र सवयी असतात. पण यूकेतील (UK) एका व्यक्तीची सवय फक्त विचित्र नाही तर किळसवाणी आहे. ही व्यक्ती तरुणींचे घाणेरडे मोजे खरेदी करते. यासाठी महिन्याला हजारो रुपये खर्च करते. त्यानंतर त्याचा असा काही वापर करते तुम्हाला धक्काच बसेल (UK man smell and taste dirty socks). हे वाचा - माझा, माझा करत एकासाठी भिडल्या दोघी! नवरीसाठी झाला टॉस, नवरदेवाने निवडली नवरी हल शहरात राहणारी की व्यक्ती, मिस्टर डी असं तिचं नाव सांगण्यात आलं आहे. आपल्याला तरुणींचे घाणेरडे पाय आणि मोजे आकर्षित करतात पण आपल्याला कोणताही आजार नाही, आपण पूर्णपणे ठिक आहोत, सामान्य व्यक्तीप्रमाणेच आहोत. असा दावा या व्यक्तीने केला आहे. हल डेली मेलच्या रिपोर्टनुसार या मोज्यांसाठी  तो महिन्याला जवळपास 200 पाऊंड म्हणजे जवळपास 20 हजार रुपये खर्च करतो. मोज्यांची किंमत त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. म्हणजे जर ती सेलिब्रिटी असेल तर तिला जादा पैसे देतो. पण फक्त हे मोजे तरुणींचे असतात. फक्त 21 ते 38 वयोगटातील तरुणींचे मोजे तो खरेदी करतो. हे वाचा - इथं प्रत्येक पुरुषाच्या 2 बायका! दुसऱ्या लग्नाला नकार दिल्यास मिळते भयानक शिक्षा आता तुम्हाला एक प्रश्न नक्कीच पडला असेल की या घाणेरड्या, दुर्गंधीयुक्त मोज्यांचं तो करतो काय?. तर तो या घाणेरड्या मोज्यांचा वास घेतो. इतकंच नव्हे तर त्याची चवसुद्धा चाखतो. म्हणजे तो हे दुर्गंधीयुक्त मोजे तोंडात ठेवतो.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Viral, Viral news, World news

    पुढील बातम्या