पहावं ते नवलंच! भारतीय कुर्तींना बोहो ड्रेस सांगून विकतोय हा यूकेतला ब्रॅण्ड

पहावं ते नवलंच! भारतीय कुर्तींना बोहो ड्रेस सांगून विकतोय हा यूकेतला ब्रॅण्ड

ज्या ड्रेसला 'थ्रिफ्टेड'ने त्यांच्या वेबसाइटवर विनटेज बोहो ड्रेसच्या नाव सांगून सेलवर लावले आहे तो एक भारतीय पारंपरिक पेहराव आहे.

  • Share this:

इंग्लंडमध्ये 'थ्रिफ्टेड' हा एक प्रसिद्ध फॅशन ब्रॅण्ड आहे. काही दिवसांपासून या ब्रॅण्डला सोशल मीडियावर फार ट्रोल केलं जात आहे. असं म्हटलं जातं की हा ब्रॅण्ड 'विंटेज बोहो ड्रेस' (vintage boho dress) च्या नावाखाली भारतीय पारंपरिक कुर्ते विकत आहे. भारतीय कुर्ते आणि बोहो ड्रेस याच्यात फार अंतर आहे. दोन वेगवेगळ्या देशातील हे पेहराव असून कुर्ता हा भारतात पारंपारिक ड्रेस म्हणून घालण्यात येतो. यामुळेच 'थ्रिफ्टेड'वर देशाच्या संस्कृतीची थट्टा उडवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ज्या ड्रेसला 'थ्रिफ्टेड'ने त्यांच्या वेबसाइटवर विनटेज बोहो ड्रेसच्या नाव सांगून सेलवर लावले आहे तो एक भारतीय पारंपरिक पेहराव आहे. याला सूट, पंजाबी ड्रेस किंवा सलवार कमीज असं म्हटलं जातं. पण या वेबसाइटवर मात्र कपड्याचा फक्त वरचा भाग ज्याला कुर्ता म्हणतात तो दाखवून विनटेज बोहो ड्रेस असं नाव दिलं आहे.

यावरून होणारा विरोध पाहून वेबसाइटने हे ड्रेस काढून टाकले आहेत. मेट्रो नावाच्या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, थ्रिफ्टेड डॉट कॉमने एका सेकण्डहॅण्ड ड्रेस सप्लायरकडून हे सर्व कपडे विकत घेतले होते. विक्रेत्याने या ड्रेसला बोहो ड्रेस असं सांगितलं होतं. पण सतत सोशल मीडियावर लोकांनी 'थ्रिफ्टेड'ला ट्रोल केल्यानंतर त्यांनी या संबंधिचे सर्व फोटो साइटवरून काढून टाकले.

साप- विंचू चावल्यास किचनच्या या वस्तू येतील तुमच्या मदतीला

डोळ्यांखालची सूज कमी करायची आहे, तर हे 5 उपाय करू शकतात तुमची मदत!

Vastushastra Tips: ऑफिसमध्ये प्रमोशन हवं असेल तर या वास्तू टिप्स नक्की वापरा

हाताच्या या रेषांमध्ये लपलेत तुमच्या लव्ह लाइफचे रहस्य!

 

Published by: Madhura Nerurkar
First published: September 13, 2019, 6:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading