मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /नव्या स्ट्रेनचा धसका! तिसऱ्या कोरोना लशीला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी

नव्या स्ट्रेनचा धसका! तिसऱ्या कोरोना लशीला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे (corona new strain) प्रकरणं झपाट्यानं वाढू लागली आहे, त्याला रोखण्यासाठी आता धडपड सुरू झाली आहे.

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे (corona new strain) प्रकरणं झपाट्यानं वाढू लागली आहे, त्याला रोखण्यासाठी आता धडपड सुरू झाली आहे.

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे (corona new strain) प्रकरणं झपाट्यानं वाढू लागली आहे, त्याला रोखण्यासाठी आता धडपड सुरू झाली आहे.

ब्रिटन, 08 जानेवारी :यूकेमध्ये (UK) आढळेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे (corona new strain) प्रकरणं झपाट्यानं वाढू लागली आहे. त्यामुळे संपूर्ण जगानं याचा धसका घेतला आहे. विशेषत: ब्रिटननं आता धडपड सुरू आहे. देशात आता तिसऱ्या कोरोना लशीला (corona vaccine) आपात्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. अमेरिकेतील मॉडर्ना (Moderna) कंपनीच्या लशीला ब्रिटनमध्ये परवानगी देण्यात आली आहे. ही लस कोरोनाच्या नव्या स्ट्रेनविरोधातही प्रभावी असल्याचं सांगितलं जातं आहे.

मॉडर्नाच्या कोरोना लशीचा आपत्कालीन वापराला ब्रिटनच्या आरोग्य विभागानं हिरवा कंदील दिला आहे. ही लस सुरक्षित, प्रभावी आणि परिणामकारक असल्याचा MHRA च्या तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

ब्रिटनमध्ये आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळालेली ही तिसरी लस आहे. याआधी फायझर-बायोएनटेकच्या आणि ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या कोरोना लशीचा वापर सुरू करण्यात आला आहे.

मॉडर्ना कंपनीनं याआधी क्लिनिक ट्रायलच्या अहवालानुसार दिलेल्या माहितीत ही लस लक्षणं न दिसणाऱ्या (Asymptomatic Infections) कोरोना रुग्णांवर देखील प्रभावी ठरणार आहे. त्याचबरोबर या लशीचा एक डोस या रुग्णांना पुरेसा ठरणार असून एका लशीमध्येच त्यांना फायदा मिळणार आहे. ही लस घेतल्यानंतर शरीरामध्ये 3 महिने अँटीबॉडी राहत असल्याचा दावाही कंपनीने केलेला आहे.

ब्रिटनमध्ये गंभीर परिस्थिती

ब्रिटनमध्ये कोरोनाची परिस्थिती इतकी गंभीर आहे की 9 महिन्यांत पहिल्यांदाच गुरुवारी दिवसभरात 1000 कोरोना बळी गेले आहेत.  AFP वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार यूकेत गुरुवारी कोरोनामुळे  1,000 पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल 2020 नंतर पहिल्यांदाच सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. यूकेसाठी ही चिंताजनक बाब आहे.

हे वाचा - नव्या कोरोनाचा धोका वाढला; रुग्ण संख्या 80 पार, UK हून आणखी 246 प्रवासी भारतात

यूकेत नव्या कोरोनामुळे कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्यानं वाढते आहे. कारण हा व्हायरस अधिक संसर्गजन्य आहे, वेगानं पसरणारा आहे. त्यामुळे  ब्रिटनमध्ये  पुन्हा एकदा लॉकडाउनलागू करण्याची घोषणा  पंतप्रधान बेरिस जॉन्सन यांनी केली. लॉकडाउनमध्ये जखडलेल्या जगाने आता कुठे कोरोनाच्या महामारीतून सुटका करून घेतली होती. तेच ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाचा विषाणू आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. मागील दोन आठवड्यांपासून ब्रिटनमध्ये खबरदारी घेतली जात आहे. अखेर शेवटचा तोडगा म्हणून ब्रिटनमध्ये आता लॉकडाउन करण्यात आले आहे.

हे वाचा - मेड इन चायना कोरोना लशीचे 73 Side effect; चिनी डॉक्टरनंच केली पोलखोल

नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा हा नवीन स्ट्रेन खूप वेगात पसरल्याचंही संशोधनातून समोर आलं आहे. इम्पीरियल कॉलेजने गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ब्रिटनमधील सर्व शाळा सुरु असताना संबंधित डेटा गोळा केला होता. वैज्ञानिकांच्या मते, केवळ 20 वर्षांखालील लोकांनाच नव्हे तर इतर वयोगटातील लोकांनाही या नव्या विषाणूची वेगाने लागण होत आहे. ब्रिटनमध्ये जवळपास तीनपट ही नवीन प्रकरणं वाढली आहेत.

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus