OMG! अवघ्या 8 आठवड्यांच्या चिमुरड्याला देणार तब्बल 16 कोटींचं एक इंजेक्शन

OMG! अवघ्या 8 आठवड्यांच्या चिमुरड्याला देणार तब्बल 16 कोटींचं एक इंजेक्शन

जगातील सर्वात महागडं इंजेक्शन या चिमुरड्याला दिलं जातं आहे, असा त्याला नेमका कोणता आजार आहे?

  • Share this:

लंडन, 16 डिसेंबर :  16 कोटी रुपयांचं एक इंजेक्शन... (injection) किंमत वाचूनच मोठा धक्का बसला ना? असे कित्येक आजार आहेत ज्यांचे उपचार, औषधं, इंजेक्शन महाग असतात. अनेकांना ते परडवणारे नसतात. मात्र एका इंजेक्शनसाठी 16 कोटी रुपये म्हणजे खूपच जास्त आहेत आणि इतकं महागडं इंजेक्शन यूकेतील (UK) अवघ्या 8 आठवड्यांच्या चिमुरड्याला हे इंजेक्शन दिलं जाणार आहे. जगातील हे सर्वात महागडं इन्जेक्शन असल्याचं सांगितलं जातं आहे. इतकं महाग इन्जेक्शन देण्याइतकं या चिमुरड्याला नेमका कोणता आजार आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

ज्या चिमुरड्याला हे इंजेक्शन दिलं जाणार आहे त्याचं नाव एडवर्ड आहे. एडवर्डला जेनेटिक स्पाइनल मस्कुलर अट्रोफी म्हणजेच SMA हा आजार आहे. शरीरात एसएमएन-1 जीनची कमतरता असल्यास हा आजार होतो. यामुळे छातीतील मांसपेशी कमजोर होऊ लागतात आणि श्वास घ्यायला त्रास होतो. यावर वेळीच उपचार झाले नाहीतर तर गंभीर होऊन रुग्णाचा मृत्यूही होतो.

सामान्यपणे हा आजार लहान मुलांमध्ये पाहायला मिळतो.  ब्रिटनमध्ये या आजाराचे अनेक रुग्ण आहेत. तिथं दरवर्षी जवळपास 60 मुलं अशी जन्माला येतात ज्यांना हा आजार असतो.

हे वाचा - ऐकावं ते नवलच; देवी नाही प्लेग नाही या देशात पसरली होती नाचण्याची साथ

या आजारावर काही वर्षांपूर्वीच इंजेक्शनच्या रूपानं उपचार उपलब्ध झालं. 2017 साली हे इन्जेक्शन तयार करण्यात यश मिळालं. ज्याची टेस्टिंगही यशस्वी झाली. 2017  साली 15 मुलांना हे औषध देण्यात आलं. 20 आठवडे त्यांचं निरीक्षण केलं, त्यांच्यावर कोणताही दुष्परिणाम झाला नाही. तेव्हापासून या इंजेक्शनचं उत्पादन सुरू करण्यात आलं.

हे इन्जेक्शन आहे जोलगेनेस्मा. जोलगेनेस्मा तीन जीन थेरेपीपैकी एक आहे, ज्याला फक्त युरोपमध्येच वापरण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळेच या इंजेक्शनची किंमत इतकी आहे. ब्रिटनमध्ये हे इंजेक्शन अमेरिका, जर्मनी आणि जपानमधून मागवलं जातं. हे इंजेक्शन फक्त एकदाच दिलं जातं.

हे वाचा - ब्रेस्टफिंडिंग करणाऱ्या मातांसाठी; दूध येत नसेल तर बाळाच्या आईने खावेत 10 पदार्थ

आता इंजेक्शनची इतकी किंमत खरंतर त्याच्या पालकांनाही परवडणारी नाही. त्यामुळे त्यांना क्राऊड फंडिगचा मार्ग स्वीकारला. आज तकच्या रिपोर्टनुसार क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून त्यांनी आपल्या चिमुरड्यासाठी पैसे जमा करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत त्यांना 1.17 कोटी रुपये जमा झाले आहे.

Published by: Priya Lad
First published: December 16, 2020, 3:42 PM IST

ताज्या बातम्या