ब्रिटन, 01 मे : सामान्यपणे नवजात बाळाचं (New Born Baby) सरासरी वजन साधारण 3.4 किलो असणं आवश्यक आहे. मात्र क्वचित वेळा बाळाचं वजन या सर्वसाधारण वजनापेक्षा खूपच जास्त असते. ब्रिटनमध्ये (UK heaviest Baby) असंच वजनदार बाळ जन्माला आलं आहे. जन्माला येतानाच या बाळानं सर्वांत जास्त वजनाचं दुसरं बाळ ठरण्याचा विक्रम नोंदवला आहे.
अवघ्या एकवीस वर्षांची अंबर कंबरलँडने या बाळाला जन्म दिला आहे. जन्मतःच या बाळाचे वजन 12 पाउंड 14 औंस म्हणजे साधारण 5.8 किलो (5.8 kg baby) होतं. ब्रिटनमधीलहे दुसरं सर्वात वजनदार बाळ आहे. ही मुलगी असून तिचं नाव एमेलिया आहे. गर्भारपणाच्या काळात अंबरचं पोट सर्वसाधारण गर्भवती महिलांपेक्षा खूपच मोठं दिसत होतं. त्यामुळे आधी डॉक्टरांना वाटलं की कदाचित जुळी मुलं (Twins) असावीत. मात्र तपासणी दरम्यान एकच गर्भ वाढत असल्याचं स्पष्ट झालं. अंबरनं 16 एप्रिल रोजी तिच्या मुलीला जन्म दिला.
हे वाचा - आधी बाप मिठी मारून ढसाढसा रडला आणि नंतर...; कधीच पाहिली नसेल लेकीची अशी पाठवणी
या बाळाचे वजन 2012 मध्ये जन्मलेल्या सर्वांत जास्त वजनाच्या बाळापेक्षा फक्त दोन पाऊंडने कमी आहे. त्यामुळे हे बाळ ब्रिटनमधील दुसरं सर्वांत जास्त वजनाचे नवजात बाळ ठरलं आहे. या बाळाची आई अंबर टाईम्स नाऊशी बोलताना म्हणाली की, "गर्भधारणेदरम्यान जुळं असल्याचं डॉक्टरांना वाटलं होतं. अल्ट्रासाउंड तपासणी दरम्यान एकच गर्भ दिसल्यानं दुसरा गर्भ त्याआड लपला असावा असंच सगळ्यांना वाटत होतं. जेव्हा तिची मुलगी जन्माला आली तेव्हा तिला बघून सर्व डॉक्टर्स आश्चर्यचकित झाले"
हे वाचा - दगड, माती आणि बरंच काही...; 8 महिन्यांच्या बाळाला खायला देते ही आई कारण...
वैदयकीय अहवालानुसार, साधारण 36 आठवड्याच्या अर्भकाचं जे वजन अपेक्षित असतं या बाळाचं तेवढं वजन 32 व्या आठवड्यांतच झालं होतं. बाळाचं वजनथोड्या अधिक प्रमाणातअसेल तर आई आणि बाळाच्या जीवाला काहीधोकानसतो पणवजन अपेक्षेपेक्षाखूपचजास्त असेलतर बाळाला आणिआईलाही धोकाहोऊशकतो.आईची तब्ब्येत,वय,कितवं मूल आणि अनुवंशिकता आदी बाबींचाबाळाच्या वजनावर परिणामहोत असतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Small baby, Weight