आता उबरही करणार फूड डिलिव्हरी

आता उबरही करणार फूड डिलिव्हरी

सध्यातरी ही सुविधा फक्त मुंबईतच सुरू झाली आहे, पण वर्षाच्या शेवटीपर्यंत सहा देशात ही सुविधा सुरू करण्यात येईल.

  • Share this:

02 मे : उबर या टॅक्सी कंपनीने आता भारतात उबरईट्स ही फूड डिलिव्हरी सुविधा आजपासून सुरू केली आहे. सध्यातरी ही सुविधा फक्त मुंबईतच सुरू झाली आहे, पण वर्षाच्या शेवटीपर्यंत सहा देशात ही सुविधा सुरू करण्यात येईल. मुंबई वगळता बाकीच्या देशांची नाव कंपनीने अद्यापही जाहीर केली नाही.

उबरईट्सचे प्रमुख भाविक राठोड यांनी आपल्या अधिकृत माहितीनुसार, मुंबई हे वेगाने वाढणारं खाद्य पदार्थाचं शहर आहे. इथली खाद्यसंस्कृती आकर्षिक आहे, जिथे आपल्याला लोकल आणि जगभरातील अनेक प्रसिद्ध खाद्यपदार्थ चाखायला मिळतात. मुंबईमध्ये उबरईट्स सुरू करणं म्हणजे उबेरचा जागतिक विस्तार करण्याच्या दृष्टीने हे नवं पाऊल आहे.

जानेवारीमध्ये उबरईट्स ही सुविधा अन्य देशांमध्ये सुरू करण्यात आली, त्यात जगातील 26 देशांचा आणि 78 शहरांचा समावेश आहे. सर्वात आधी 2014 मध्ये हा प्रकल्प लॉस एंजिलिस सुरू करण्यात आला. मार्चमध्ये सिंगापूर आणि नंतर एशियामध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. टोकीयो आणि बँकॉकमध्येही ही सुविधा कार्यरत आहे. आजपासुन मुंबईकरही या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

First published: May 2, 2017, 9:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading