'ही' चूक केल्यावर बुक करता नाही येणार UBER, लागू होईल 'लाईफ बॅन'चा नियम

Uber बुक करताना या नियमांचं पालन केलं नाही तर आयुष्यभरासाठी तुमच्यावर बॅन लागू शकतो आणि तुमची सेवा बंद केली जाऊ शकते.

  • Share this:

Uber टॅक्सी सेवा सगळ्या मोठ्या शहरांची लाईफ लाईन बनली आहे. पण जर टॅक्सी ड्रायव्हरसोबत तुम्ही बेशिस्तपणे वागलात तर तुम्हाला कधीही सेवा वापरता येणार नाही.

29 जानेवारीत उबरने नवीन कम्युनिटी गाईडलाईन जारी केली आहे. ज्यात तुम्ही ड्राईव्हर किंवा इतर प्रवाशांसोबत गैरवर्तणूक करून त्यांचं नुकसान करता तर तुम्हाला ब्लॉक केलं जाईल.

जानेवारीत उबरने नवीन कम्युनिटी गाईडलाईन जारी केली आहे. ज्यात तुम्ही ड्राईव्हर किंवा इतर प्रवाशांसोबत गैरवर्तणूक करून त्यांचं नुकसान करता तर तुम्हाला ब्लॉक केलं जाईल.

जसं ग्राहकांच्या तक्रारीने ड्राईव्हरवर कारवाई केली जाते तसंच ड्राईव्हरच्या तक्रारीवर ग्राहकांविरोधातही कारवाई केली जाईल. प्रवासादरम्यान इतर लोकांना शिवीगाळ किंवा मारहाण केल्यावर त्या व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही केली जाईल.

ड्राईव्हरच्या तक्रारीसोबतच प्रवाशाने दिलेल्या रेटिंगवरही लक्ष दिलं जाईल. कम्युनिटी गाईडलाईनचं सतत उल्लंघन करणारे आणि अनेक दिवसांपासून कमी रेटिंग देणाऱ्यांनासुद्धा ब्लॉक केलं जाईल. असा प्रवाशांना कंपनीकडून अलर्ट मेसेज पाठवला जाईल.

Uberमध्ये ड्राईव्हरच्या सुरक्षेसाठी एक इमरजन्सी बटन दिलं आहे. या बटनाला प्रेस करून ड्राईव्हरला इमरजन्सी मदत मागता येणार आहे. प्रवाशांसाठी ही सेवा आधीपासून उपलब्ध असून Uber अॅप्लिकेशनमध्ये स्पीड लिमिट फिचर दिलं आहे. ज्यामुळे ड्राईव्हरने स्पीड वाढवल्यास त्याला स्पीडबाबत अलर्ट केलं जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 31, 2019 03:49 PM IST

ताज्या बातम्या