• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Types of love: प्रेम म्हणजे प्रेम असतं.. त्याचे इतके प्रकारही असतात; जाणून घ्या प्रेमाविषयी या गोष्टी

Types of love: प्रेम म्हणजे प्रेम असतं.. त्याचे इतके प्रकारही असतात; जाणून घ्या प्रेमाविषयी या गोष्टी

प्रेम ही एक अतिशय सुंदर भावना (Love is special) आहे, जी दोन हृदयांना जवळ आणते. जेव्हा दोन लोक एकमेकांची मनापासून काळजी घेतात, तेव्हा दोघांमध्ये प्रेमासारख्या खोल भावना निर्माण होतात, ज्यामध्ये दोघेही एकमेकांच्या भावना आणि स्पेसचाही (Feelings and space) आदर करतात.

 • Share this:
  नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर : प्रेम ही एक अतिशय सुंदर भावना (Love is special) आहे, जी दोन हृदयांना जवळ आणते. जेव्हा दोन लोक एकमेकांची मनापासून काळजी घेतात, तेव्हा दोघांमध्ये प्रेमासारख्या खोल भावना निर्माण होतात, ज्यामध्ये दोघेही एकमेकांच्या भावना आणि स्पेसचाही (Feelings and space) आदर करतात. एकमेकांची काळजी घेण्यानं, समजूतदारपणानं आणि विश्वासानं प्रेम वाढतं. तुम्ही असं प्रेम शोधलं पाहिजे, जे तुम्हाला समाधान देतं आणि तुमच्यासाठी सर्वोत्तम असल्याचं सिद्ध करतं. जिथं तुम्हाला शंका वाटत असेल तिथं लगेच योग्य विचार करून जीवनात पुढं जाण्याचा विचार करा (move on) किंवा ते नातं सुधारण्याचा (Types of love) प्रयत्न करा. जेव्हा तुमचा जोडीदार चांगला असतो, तेव्हा तुमच्यासाठी प्रेम (love) ही एक सुंदर भावना बनते. तुमचं नातं ही तुमची ताकद बनते. इथं आम्ही तुम्हाला प्रेमाचे चार प्रकार सांगणार आहोत. ज्याचा तुम्ही तुमच्या आयुष्यात अनुभव घेऊ शकता. भावनिक प्रेम (Emotional love) भावनिक प्रेम तुमच्या आतल्या भावना तुम्हाला व्यक्त करायला लावतं. यात तुमच्यातील प्रेमाला अंत नाही असं तुम्हाला वाटतं. भावनिक प्रेम तुम्हाला अश्रू, आनंद आणि समज देतं. यामध्ये तुम्हाला असं वाटतं की तुमचा जोडीदार शारीरिकचदृष्ट्या तर तुमच्या सोबत असला पाहिजेच. शिवाय, त्यानं तुम्हाला मानसिकदृष्ट्याही खोलवर समजून घ्यावं आणि प्रेम करावं. मानसिक प्रेम (Mental love) या प्रकारच्या प्रेमात तुम्ही तुमचं मन वापरता, तुमचं हृदय नाही. अशा प्रकारचं प्रेम तुम्हाला तार्किकदृष्ट्या, भावना आणि कृतीबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करतं. पुढे जाताना, तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या कृती आणि भावनांचं विश्लेषण करता आणि यामुळं तुमच्या अनेक भावना उचंबळून येतात. हे वाचा - Fast Weight Loss Tips: लठ्ठपणा कमी करण्यासाठी या सोप्या पद्धतींचा करा वापर; काही आठवड्यांमध्ये दिसेल फरक अध्यात्मिक प्रेम (Spiritual Love) जेव्हा आध्यात्मिक प्रेमाचा विचार केला जातो, तेव्हा अशा जोडप्यामधील संबंध, केमेस्ट्री आणि बंध हे एका वेगळ्या पातळीवर जातात. अशी नाती खूप अर्थपूर्ण असतात. तुमच्या जोडीदाराच्या अस्तित्व आणि उर्जेनं तुम्ही खूप आकर्षित होत आहात, असं तुम्हाला वाटेल. हा आध्यात्मिक संबंध आणि प्रेमाचा आधार आहे. शारीरिक प्रेम (Physical Love) हे प्रेम जिव्हाळ्याचा स्पर्श, आपुलकी आणि आकर्षणाशी निगडीत आहे. तुमच्या प्रियकराचा स्पर्श तुम्हाला एकमेकांच्या जवळ आल्याचा अनुभव देतो आणि एक सुंदर अनुभूती देतो. तुमच्या जोडीदाराच्या उपस्थितीमुळं तुम्हाला खूप चांगला आणि आरामदायी अनुभव येतो. तुम्हाला एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटतो. यामुळं तुम्हाला एकमेकांविषयी कामोत्तेजनाही निर्माण होते. हे वाचा - Chemical Castration: केमिकल कॅस्ट्रेशन म्हणजे नेमकं काय? बलात्काऱ्यांना अशी दिली जाणार ही शिक्षा प्रेमाचं अस्तित्व विश्वास, आपुलकी आणि समजून घेतल्याशिवाय प्रेम असू शकत नाही. नाती टिकवण्यासाठी खूप संयम आणि प्रामाणिकपणा लागतो. या 4 प्रकारचं प्रेम मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराशी एकनिष्ठ असणं आवश्यक असतं. असं झालं तर तुम्ही या सर्व प्रकारच्या प्रेमाचा चांगल्या प्रकारे अनुभव घ्याल. आपल्याला फक्त प्रेमावर प्रामाणिकपणे विश्वास ठेवण्याची आणि विश्वास संपादन करण्याची आवश्यकता आहे.
  Published by:News18 Desk
  First published: