KISS चेही असतात अर्थ; या 7 प्रकारच्या KISS मुळे नातं होईल मजबूत

KISS चेही असतात अर्थ; या 7 प्रकारच्या KISS मुळे नातं होईल मजबूत

प्रेम ही एक अशी स्वर्गीय गोष्ट आहे जी आपण कितीही शब्दात मांडायचा प्रयत्न केला तरी मांडू शकत नाही.

  • Share this:

प्रेम ही एक अशी स्वर्गीय गोष्ट आहे जी आपण कितीही शब्दात मांडायचा प्रयत्न केला तरी मांडू शकत नाही. प्रेम जेवढं भावनिक असतं तेवढा स्पर्श तुम्हाला हवाहवासा असतो. स्पर्शाशिवाय प्रेम व्यक्त होत नाही. अनेकदा आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी लोक Kiss करतात. प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची एक वेगळी पद्धत असते. काहीजण फक्त चुंबनाच्या माध्यमातून त्यांच्या मनातील भावना व्यक्त करतात. प्रत्येक किस मागचा अर्थ माहीत आहे का?

गालावर kiss करण्य़ामागचा अर्थ

या किसमधून तुमच्यासाठीची प्रेमाची भावना दिसून येते. हे सहकार्य आणि परिपूर्णता दर्शवते. याशिवाय आकर्षणाचं प्रतीक म्हणूनही गालावर किस केलं जातं.

ओठांवर kiss  करण्य़ामागचा अर्थ

पार्टनरप्रती प्रेम दाखवण्याचं ही सर्वोत्तम पद्धत आहे. या किसमधून उत्कटता दिसून येते. पार्टनरप्रती असणारी प्रेमाची भावना यामधून स्पष्ट होते.

मानेवर kiss करण्य़ामागचा अर्थ

शारीरिक आकर्षण दाखवण्यासाठी कॉलरबोनवर किस केलं जातं. तसंच ते तुमच्यात गुंतले आहेत यासाठीही कॉलरबोनवर किस केलं जातं.

कानांवर kiss करण्य़ामागचा अर्थ

सेक्शुअल इन्टेशन दाखवण्यासाठी कानांवर किस केलं जातं. पण या किसचा प्रभाव पूर्णपणे किस करणाऱ्यांच्या हेतूवर अवलंबून असतो.

हातांवर kiss करण्य़ामागचा अर्थ

एखाद्याकडे आपली आवड व्यक्त करण्यासाठी हातांवर किस केलं जातं. याशिवाय हे एक विश्वासाचं प्रतीक असतं.

कपाळावर kiss करण्य़ामागचा अर्थ

प्रेम, जिव्हाळा, आपुलकी दर्शवण्यासाठी कपाळावर आपलेपणाच्या भावनेनं kiss केलं जातं. आपल्या व्यक्तीबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी अनेकदा पार्टनर किंवा रिलेशनशिपमध्ये किंवा आपली माणसं भावनिक क्षणांना कपाळावर किस करतात.

फ्लाइंग kiss करण्यामागचा अर्थ

हे किस अनेकदा शुभेच्छा देण्यासाठी किंवा गुड- बाय म्हणताना दिलं जातं. फ्लाइंग किसही नात्यांना मजबूत करण्यासाठी मदतशीर असतात.

First published: January 24, 2020, 10:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या