• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Types of Condoms : कंडोमचे असतात इतके प्रकार

Types of Condoms : कंडोमचे असतात इतके प्रकार

Types of Condoms: सध्या अनेक कंपन्यांचे कंडोम बाजारात सहज उपलब्ध आहेत. अनेकांना कंडोमविषयी बरीच माहिती आहे. तरीही आज आम्ही तुम्हाला कंडोमशी संबंधित काही रंजक गोष्टी सांगणार आहोत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : कुटुंब नियोजन तसेच नको असलेल्या गर्भधारणेसाठी कंडोमचा वापर केला जातो. जगाच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे जगभरात कुटुंब नियोजनाची साधने वापरणे गरजेचे आहे. अलिकडे पुरुषांकडून सेक्स दरम्यान कंडोमचा वापर करणं खूप सामान्य बाब आहे. महिलांचे कंडोमही बाजारात उपलब्ध आहेत, मात्र महिला बहुतांशी गर्भनिरोधक गोळ्या वापरतात. विशेष म्हणजे, लोकांना आपापसात लैंगिक संबंधांशी संबंधित माहितीवर चर्चा करणे आवडत नाही, म्हणूनच लोकांकडे याबद्दल अनेक दिशाभूल करणारी माहिती आहे. जी सत्यापासून दूर नेणारी आहे. त्याच्याशी संबंधित आणि कंडोमविषयी आज आपण (Types of Condoms) माहिती घेऊया. सध्या अनेक कंपन्यांचे कंडोम बाजारात सहज उपलब्ध आहेत. अनेकांना कंडोमविषयी बरीच माहिती आहे. तरीही आज आम्ही तुम्हाला कंडोमशी संबंधित काही रंजक गोष्टी सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची त्याबाबतची माहिती तर वाढेलच पण आतापर्यंत तुमच्या मनात घर करून राहिलेली कोणतीही दिशाभूल करणारी माहिती काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होईल. कंडोमचे 4 प्रकार आहेत आपल्या देशातील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या हा सरकारसाठी चिंतेचा विषय आहे. लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार सातत्याने जनजागृती मोहीम राबवत आहे. यामुळेच आता गर्भनिरोधक साधनांचा वापर झपाट्याने वाढू लागला आहे. WebMD च्या बातमीनुसार, बाजारात प्रामुख्याने 4 प्रकारचे कंडोम उपलब्ध आहेत. 1. लेटेक्स, प्लास्टिक कंडोम (Latex, Plastic Condom) - बहुतेक लोक लेटेक्स कंडोम वापरतात. जर तुम्हाला त्याचा त्रास होत असेल किंवा त्यामुळे अ‌ॅलर्जी होत असेल तर प्लास्टिकपासून बनवलेले कंडोम देखील वापरले जाऊ शकतात. हे वाचा - चला हवा येऊ द्या: त्या एका स्किटमुळे निलेश साबळेला धरावे लागले नारायण राणेंचे पाय, काय आहे प्रकरण? 2. ल्युब्रिकेटेड कंडोम (Lubricated Condom) – बाजारात उपलब्ध असलेल्या लुब्रिकेटेड कंडोममध्ये लिक्विडचा पातळ थर असतो जो लुब्रिकेशनमध्ये वापरला जातो. हे लैंगिक संभोगादरम्यान कोणत्याही प्रकारचे इरिटेशन किंवा वेदना प्रतिबंधित करते. तसेच संभोगादरम्यान हे कंडोम फुटण्याचा धोका नसतो. हे वाचा - अजब डिव्होर्सची गजब कहाणी! ही मॉडेल स्वत:लाच देणार घटस्फोट, पुरुषांना कंटाळून स्वत:शी केलं होतं लग्न 3. स्पर्मिसाइड कोटेड कंडोम (Spermicide Coated Condom) - बाजारात उपलब्ध असलेले काही कंडोम हे स्पर्मिसाइड कोटेड कंडोम देखील आहेत. या कंडोममध्ये नॉनॉक्सिनॉल-9 नावाचे रसायन असते. हे शुक्राणू नष्ट करते. कंडोममधील शुक्राणू नाशकाच्या प्रमाणात फारसा फरक नसला तरी त्याचा वापर गर्भधारणेचा धोका कमी करतो. 4. टेक्सचर्ड कंडोम (Textured Condom) - टेक्स्चर कंडोम देखील बाजारात उपलब्ध आहेत. यात रिब्ड आणि स्टँड प्रकार देखील आहे. हे अशा प्रकारे बनवले जातात की ते वापरताना पुरुष आणि त्याची महिला जोडीदार दोघांनाही अधिक आनंद मिळतो.
  Published by:News18 Desk
  First published: