सावधान! लहान मुलांना पोलिओ टाइप-2 व्हायरसचा धोका

सावधान! लहान मुलांना पोलिओ टाइप-2 व्हायरसचा धोका

धक्कादायक गोष्ट अशी आहे ज्याचा वापर पोलिओ रोखण्यासाठी केला जातो त्यामुळेच हा नवा आजार उद्भवत आहेत. आता जागतिक आरोग्य संघटनेशी संबंधित संस्था लसीकरण मोहिमेबाबत सावध करत आहेत.

  • Share this:

मुंबई, 27 नोव्हेंबर : दो बूंद जिंदगी के म्हणत देशातील पोलिओविरुद्ध मोहिम उघडली गेली. त्यानंतर पोलिओचं प्रमाण कमी झालं. दरम्यान, आता आफ्रिकन देशांमध्ये पोलिओसदृश्य 11 नवीन प्रकरणं समोर आली आहेत. यात धक्कादायक गोष्ट अशी आहे ज्याचा वापर पोलिओ रोखण्यासाठी केला जातो त्यामुळेच हा नवा आजार उद्भवत आहेत. आता जागतिक आरोग्य संघटनेशी संबंधित संस्था लसीकरण मोहिमेबाबत सावध करत आहेत. या सर्व प्रकरणांचा अहवाल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडे वेगवेगळ्या देशांनी पाठवला आहे. यामध्ये फक्त आफ्रिकन देशांचाच समावेश आहे.

जागतिक आरोग्य संघटनेकडं दाखल करण्यात आलेल्या या प्रकरणांकडे गांभीर्याने पाहिल्यानंतर पोलिओच्या नव्या केस समोर आल्या आहेत. यामध्ये तोंडाद्वारे लसीकरणाच्या व्हायरसमुळे होणाऱ्या केसचे प्रमाण जास्त आहे. याबाबत राष्ट्रीय वॅक्सिन माहिती केंद्राच्या सह संस्थापक आणि अध्यक्ष बारबरा फिशर यांनी सांगितलं की, अस्वच्छता आणि स्वच्छतेचा अभाव अशा परिस्थितीत राहणाऱ्या समुहात वॅक्सिन स्ट्रेन पोलिओ व्हायरस अंघोळीच्या आणि पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित करू शकतो. त्यामुळे वॅक्सिन स्ट्रेन पोलिओ पॅरालिसिस होण्याची भीती असते.

बारबरा यांनी सांगितलं की, जोपर्यंत पोलिओ प्रतिबंध मोहिम तोंडाद्वारे लसीकरण बंद करणार नाही तोवर मुलं आणि वयोवृद्धांना वॅक्सिन स्ट्रेन पोलिओ व्हायरसचा धोका असेल. कारण अशा केसेस रोखण्यासाठी स्वच्छता वाढणं गरजेचं आहेत.

ज्या देशांमध्ये पोलिओची नवी प्रकरणे समोर आली आहेत त्यामध्ये नायजेरिया, कांगो, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक आणि अंगोला या देशांचा समावेश आहे. एका बाजूला आफ्रिकेतील 7 देशांमध्ये अशी प्रकरणे समोर आली असताना आशियाई देशांतही अशा केसेस आढळल्या आहेत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये या प्रकारच्या केस पाहण्यात आल्या होत्या.

याबाबत तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, काही खास परिस्थितीत ओरल पोलिओ वॅक्सिनमध्ये असलेले व्हायरस धोकादायक ठरतात. वॅक्सिन न झाल्यानं होणाऱ्या पोलिओची जी प्रकरणं समोर आली आहेत त्यात वॅक्सिनमध्ये असलेला टाइप-2 व्हायरसने हल्ला केल्याचं समोर आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 27, 2019 08:00 PM IST

ताज्या बातम्या