मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

लक्षणं दिसण्यापूर्वी 19 वर्षं अगोदच लागू शकतो टाईप-2 डायबेटिसचा अंदाज, काय आहे संशोधन?

लक्षणं दिसण्यापूर्वी 19 वर्षं अगोदच लागू शकतो टाईप-2 डायबेटिसचा अंदाज, काय आहे संशोधन?

एका नव्या संशोधनात रक्तामध्ये असे एक प्रोटीन आढळले आहे, जे 19 वर्षांआधीच टाइप 2 मधुमेहाच्या जोखमीबद्दल माहिती देऊ शकते.

एका नव्या संशोधनात रक्तामध्ये असे एक प्रोटीन आढळले आहे, जे 19 वर्षांआधीच टाइप 2 मधुमेहाच्या जोखमीबद्दल माहिती देऊ शकते.

एका नव्या संशोधनात रक्तामध्ये असे एक प्रोटीन आढळले आहे, जे 19 वर्षांआधीच टाइप 2 मधुमेहाच्या जोखमीबद्दल माहिती देऊ शकते.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मधुमेह (Diabetes) ही जगातील एक मोठी समस्या म्हणून समोर येत आहे. भारतीय तरुणांमध्ये मधुमेहाचे अनेक रुग्ण सापडत आहेत आणि ही संख्या सातत्याने वाढत आहे. मधुमेहाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो. हा आजार रोखण्यासाठी केवळ जनजागृतीच नाही तर जीवनशैलीतही बदल करणं गरजेचं आहे. शहरांमध्ये खाण्यापिण्याच्या अनियमित सवयी आणि कमी शारीरिक हालचालींमुळे मधुमेहाचे रुग्ण जास्त वाढत आहेत. स्वीडिश विद्यापीठाच्या नेतृत्वाखाली झालेल्या अलीकडील संशोधनात, रक्तामध्ये असे एक प्रोटीन आढळले आहे, जे 19 वर्षांअगोदर टाइप 2 मधुमेहाच्या जोखमीबद्दल माहिती देऊ शकते. या संशोधनाचे निष्कर्ष जर्नल नेचर कम्युनिकेशनमध्ये (Nature Communications)  प्रकाशित करण्यात आले आहेत. टाइप 2 मधुमेह एक जागतिक महामारी म्हणून उदयास येत आहे, ज्यामुळे जगातील 6 टक्के लोकसंख्या सध्या बाधित आहे.

वजन नियंत्रित ठेवणे, तुमच्या खाण्याच्या सवयी सुधारणे आणि नियमित व्यायामामुळे टाईप 2 मधुमेहाचा धोका टाळता येऊ शकतो, इतकेच नाही तर लवकर निदान झाले तर इतर आरोग्यविषयक गुंतागुंती कमी होऊ शकतात.

तज्ज्ञ काय म्हणतात

या संशोधनाचे नेतृत्व करणारे आणि लुंड विद्यापीठातील (Lund University) सहयोगी प्राध्यापक डॉ. यांग डी मारिनिस (Yang De Marinis) म्हणाले, 'आम्हाला आढळले की रक्तातील फॉलिस्टॅटिन प्रोटीनची (follistatin protein) उच्च पातळी 19 वर्षांपूर्वीच टाईप 2 मधुमेहाचा अंदाज लावू शकते.

हे वाचा - घर सोडून 40 उंटासोबत वाळवंटात राहू लागली महिला; जगते असं आयुष्य की जाणून व्हाल हैराण

5 हजारांहून अधिक लोकांचा संशोधनात समावेश

स्वीडन आणि फिनलंडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या अभ्यासात 5318 लोकांचा समावेश करण्यात आला होता. 4 वर्षे ते 19 वर्षांच्या कालावधीत समोर आलेल्या निकालांच्या आधारे हा संशोधन निष्कर्ष काढण्यात आला. फॉलिस्टाटिन प्रोटीनचा स्राव प्रामुख्याने यकृतातून होतो, ज्यामुळे चयापचय नियंत्रित राहते.

हे वाचा - Travel Tips : तुम्हीही हिल स्टेशनवर जाण्याचा विचार करताय? मग या महत्त्वाच्या गोष्टी बॅगेत असाव्यातच

रोगाची यंत्रणा समजण्यास मदत होऊ शकते

डॉ. यांग डी मारिनिस म्हणतात, 'हे संशोधन सूचित करते की फॉलिस्टाटिनमध्ये टाइप 2 मधुमेहाचा एक महत्त्वाचा बायोमार्कर असण्याची क्षमता आहे. हे आपल्याला रोगाची यंत्रणा समजून घेण्यास देखील मदत करते. सध्या, संशोधक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित प्रणाली विकसित करण्यावर काम करत आहेत, जेणेकरून या अभ्यासाचे निष्कर्ष रोगाचे निदान आणि उपचारांमध्ये वापरले जाऊ शकतात.

First published:

Tags: Diabetes, Health, Tips for diabetes