आंधळ्या पत्नीसाठी तयार केली गुलाबाची बाग, ही अनोखी लव्हस्टोरी एकदा वाचाच!

आतापर्यंत आपण प्रेमासाठी वाट्टेल ते करायला तयार असलेली जोडपी पाहिली. त्यांच्या अंर्तमुख करणाऱ्या प्रेमकहाणीमुळे पुन्हा एकदा आपलं निर्मळ प्रेमावर विश्वास बसतो.

  • Share this:

आतापर्यंत आपण प्रेमासाठी वाट्टेल ते करायला तयार असलेली जोडपी पाहिली. त्यांच्या अंर्तमुख करणाऱ्या प्रेमकहाणीमुळे पुन्हा एकदा आपलं निर्मळ प्रेमावर विश्वास बसतो. आज आम्ही तुम्हाला अशी एक लव्हस्टोरी सांगणार आहोत जी वाचून तुम्हालाही पुन्हा एकदा प्रेमात पडावसं वाटेल.

एका व्यक्तिने आपल्या अंध पत्नीच्या प्रेमासाठी चक्क गुलाबाची बागच उभी केली. ही संपूर्ण बाग तयार करण्यासाठी त्याला दोन वर्ष लागले. (छाया सौजन्य- यूट्यूब)

हे आहेत कुरोकी पती- पत्नी. 1965 मध्ये दोघांचं लग्न झालं. हे दोघं जपानच्या शिंतोमी येथे डेअरी फार्म चालवायचे. द टेलिग्राफने सर्वप्रथम या जोडप्यांना प्रकाशझोतात आणलं. दोघंही आपलं आयुष्य आनंदाने जगत होते आणि निवृत्तीनंतर जपान फिरण्याची स्वप्न पाहत होते. (छाया सौजन्य- यूट्यूब)

म्हणतात ना नियतीसमोर कोणाचंच काही चालत नाही. या दोघांच्या आयुष्यातही असंच एक वादळ आलं. वयाच्या 52 व्या वर्षी मधुमेहामुळे पत्नी कुरोकी अंध झाल्या. (छाया सौजन्य- यूट्यूब)

अंध झाल्यानंतर मिसेस कुरोकी या जास्तीत जास्त वेळ घरीच असायच्या. यामुळे मिस्टर कुरोकी यांना पत्नी आनंदी रहावी असंच वाटायचं. कुरोकी यांची एक छोटी बाग होती. यात काही गुलाबांची रोपं त्यांनी लावली होती. लोक नेहमीच त्यांच्याकडील गुलांबांचं भरभरून कौतुक करायचे. (छाया सौजन्य- यूट्यूब)

कुरोकी यांना पूर्ण कल्पना होती की आता त्यांची पत्नी जपान फिरू शकत नाही. म्हणून त्यांनी एक धम्माल शक्कल लढवली. त्यांनी असं काही केलं की, जपान आणि परदेशातूनच लोक त्यांच्या घरी येतील. यानंतर त्यांनी निश्चित केलं की, गुलाबी Shibazakuru लावतील. जेणेकरून जास्तीत जास्त लोक त्यांच्या इथे फिरायला येतील. (छाया सौजन्य- यूट्यूब)

मिस्टर कुरोकी यांना पूर्ण बाग तयार करण्यासाठी जवळपास दोन वर्ष लागली. शेवटी त्यांनी आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावर आनंद परत आणला. मिस्टर कुरोकी यांची बाग ही पर्यटनाचं मुख्य ठिकाण झालं. जेव्हा फुलांच्या बहराचा काळ असतो तेव्हा तिथे जवळपास 7 हजार लोक फूलांची बाग पाहायला येतात आणि त्यांची प्रेम कहाणी ऐकून मंत्रमुग्ध होतात. (छाया सौजन्य- यूट्यूब)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2019 07:45 PM IST

ताज्या बातम्या