अरेच्चा! माणसंच नाही इथे तर मांजरीचे आहेत 'दोन रंग'

अरेच्चा! माणसंच नाही इथे तर मांजरीचे आहेत 'दोन रंग'

  • Share this:

मुंबई, 27 फेब्रुवारी : असं म्हणतात की माणूस कायम दोन भूमिकांमध्ये दोन चेहऱ्यांनी वावरत असतो. दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे तसंच प्रत्यक्षात समाजात वागणारा माणूस आणि अंतरमनातील अस्तित्व या दोन मुखवट्यांमध्ये दडलेला माणून कायम वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये अनुभवत असतो. पण जगभरात असा एक प्राणी व्हायरल होतो आहे जो खरोखरच दोन रंगांचा आहे. मग आता तुम्ही म्हणाल या नवीन ते काय? प्राणी मल्टिकलर किंवा एकापेक्षा अनेक रंगाचे असतातच.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो जर आपण नीट पाहिला तर लक्षात येईल. दोन रंग आणि दोन चेहरेच जणू एकत्र आल्याचा भास या प्राण्याकडे पाहिल्यावर होतो. ही आहे मांजर. या ही मांजरीच्या अंगावर दोन रंग तर आहेतच पण तिचा चेहरा नीट पाहिल्यावर लक्षात येईल की या मांजरीचे दोन डोळेही वेगळे आहेत. डोळे कान नाक आणि चेहरा नीट पाहिल्यावर या मांजरीचं वेगळेपण लक्षात येईल.

View this post on Instagram

❤️ Y en caso de que no nos veamos: "Buenos días, buenas tardes y buenas noches" Quimera, la gata de dos caras Chimera, two faced cat Химера двуликая кошка Quimera, a gata de duas caras 奇美拉,两面猫 #cat #cats #quimera #catsagram #catstagram #kitten #kitty #kittens #pet #pets #animal #animals #petstagram #petsagram #photooftheday #catsofinstagram #ilovemycat #instagramcats #кот #catoftheday #lovecats #猫 #lovekittens #adorable #catlover #instacat #love #gato #gatos #Кошка

A post shared by Quimera twofacedcat (@gataquimera) on

सोशल मीडियावर या मांजरीनं सर्व युझर्सचं लक्ष वेधून घेतलं आहे. या मांजरीच्या अर्ध्या चेहऱ्याचा आणि डोळ्याचा रंग वेगळा असल्यानं युझर्सच्या चर्चेचा विषय बनली आहे. म्हटलं तर क्युट आणि म्हटलं तर रागीट असा या मांजरीचा लूक व्हायरल होत आहे. हे फोटो पाहून आपला दिवसभराचा ताणही दूर होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 27, 2020 09:17 PM IST

ताज्या बातम्या