Home /News /lifestyle /

आश्चर्य! एकाच वेळी प्रेग्नंट, डिलीव्हरीही एकाच दिवशी; जुळ्या बहिणींची मुलंही आता Same to Same

आश्चर्य! एकाच वेळी प्रेग्नंट, डिलीव्हरीही एकाच दिवशी; जुळ्या बहिणींची मुलंही आता Same to Same

जुळ्या बहिणींच्या प्रेग्नन्सीची आणि त्यांच्या मुलांची सर्वत्र चर्चा होते आहे.

    मुंबई, 14 मे : बऱ्याच फिल्ममध्ये तुम्ही जुळी भांवंडं पाहिली असतील. ज्यांचं आयुष्यही किती तंतोतंत जुळतं हे दाखवलं जातं. एक रडलं तर दुसरंही रडतं, एक हसलं तर दुसरंही हसतं. खऱ्या आयुष्यातही जुळी मुलं होतात पण त्यांच्यात इतकं साम्य असतंच असं नाही. पण अशाच जुळ्या बहिणींनी मात्र सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. या बहिणी एकाच दिवशी प्रेग्नंट झाल्या (Twin sisters pregnant at same time), त्यांची डिलीव्हरीही एकाच दिवशी झाली (Twin sisters gave birth to child on same day) आणि शॉकिंग म्हणजे त्यांची मुलंही सेम टू सेम आहेत. जुळ्या बहिणी असल्या की आपल्यालाही जुळा जोडीदार मिळावा, आपलं लग्न एकत्र व्हावं, आपण प्रेग्नंटही एकत्र व्हावं, आपली डिलीव्हरी एकाच दिवशी व्हावं, अशा इच्छा त्यांच्या असतात. या सर्व इच्छा पूर्ण होतीलच अशा नाही कारण त्या आपल्या हातात नाहीत याची कल्पनाही आपल्याला आहे. पण जिल जस्टिनियानी (Jill Justiniani) आणि एरिन चेप्लाक (Erin Cheplak) या जुळ्या बहिणींच्या बाबतीत मात्र हे घडलं. हे वाचा - Shocking! तो घास तोंडात घेणार तोच...; 'मसालेदार चिली'तून शीर नसलेल्या बेडकाने मारली उडी जिल जस्टिनियानी (Jill Justiniani) आणि एरिन चेप्लाक (Erin Cheplak) जुळ्या बहिणी. ज्यांनी नुकताच त्यांच्या बाळांना दिला आहे. या जुळ्या बहिणींची मुलंही दिसायला एकमेकांसारखीच आहेत. एबीसी न्यूजच्या रिपोर्टनुसार, 5 मे रोजी जिल आणि एरिनला एकाच दिवशी एकाच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोघांनी फक्त काही तासांच्या अंतराने एकाच दिवसात बाळांना जन्म दिला. दोघांनाही मुलगा झाला आहे. जिलचा मुलगा ऑलिव्हर ज्याचा जन्म संध्याकाळी 6:39 वाजता झाला. तर त्याच्या पाच तासांनंतर रात्री 11:31 वाजता एरिनचा मुलगा सिलासचा जन्म झाला. या मुलांचं उंची, वजन सारखंच आहे. हे वाचा - या तरुणीचा फोटो पाहून वयाचा अंदाजही लावू शकत नाही; विचित्र आजारामुळे झालीये ही अवस्था आश्चर्य म्हणजे जिल आणि एरिन दोघी एकाच वेळी प्रेग्नंट झाल्या होत्या. त्यावेळी आपली मुलंही एकाच दिवशी जन्माला येतील याची कल्पनाही त्यांना नव्हती. प्रेग्नन्सीवेळी त्या वेगवेगळ्या शहरात राहत होत्या. डिलीव्हरीच्या काही दिवस आधी त्या एकत्र राहू लागल्या आणि त्यांनी एकाच दिवशी आपल्या मुलांना जन्म दिला. आई आणि बाळ दोघंही निरोगी असून. डिलीव्हरीनंतर दोन दिवसांतच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Pregnancy, Pregnant woman, Viral, Woman

    पुढील बातम्या