मुंबई, 27 फेब्रुवारी : 2016 या वर्षी लोकप्रिय लेखक मार्क मॅन्सन यानं लिहिलेलं 'द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फ*' हे पुस्तक आलं. हे पुस्तक अल्पावधीतच बेस्ट सेलर ठरलं. (book by mark Manson)
हे पुस्तक हातोहात खपण्याचं कारण म्हणजे या पुस्तकानं त्याच्या शीर्षकात सांगितलेली ट्रिक अत्यंत प्रभावीपणे शिकवली. हे पुस्तक अत्यंत वास्तववादी आहे. भवतालच्या जगातलं वास्तव हे पुस्तक अगदी आहे तसं तुमच्या समोर आणून उभं करतं. (Subtle art of not giving a f*ck)
लेखकानं स्वतःचे काही जीवनानुभवही इथं सांगितले आहेत. यातून त्याचे मुद्दे वाचकाला थेट पटतात आणि भिडतात. पुस्तकाचा वाचकावर खोल प्रभाव पडतो. आणि याचमुळं हे पुस्तक अनेकांनी वाचलं आहे. (quotes from the book Subtle art of not giving a f*ck)
'द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फ*' या पुस्तकातली 12 अत्यंत अर्थपूर्ण कोट्स अर्थात वचने जाणून घ्या. यातून तुमचं जगणं आणखी सुस्पष्ट होईल. (life living philosophy by Mark Manson)
1. जगणं खरंतर समस्यांची न संपणारी मालिका आहे. एका समस्येचं उत्तर हे केवळ दुसऱ्या समस्येची निर्मिती असतं.
2. नुसतंच बसून राहू नका. काहीतरी करा. उत्तर मागोमाग येईल.
3. तुम्हाला समस्यांकडे पाहण्याची दृष्टी बदलायची असेल तर तुम्ही नेमकी कशाची किंमत करता आणि जय-पराजय कसा मोजता ते बदललं पाहिजे.
4.चुकण्यातून बदलाची शक्यता जन्मते. चुकण्यातून वाढण्याची एक शक्यता समोर येते.
5.शेवटी हेच सिद्ध होतं, की प्रतिकूलता आणि पराभव या दोन्ही गोष्टी खरंतर सशक्त मनाच्या यशस्वी व्यक्तींना घडवण्यास उपयोगी आणि गरजेच्याही असतात.
6.आपण काय नाकारतो यावरच आपली ओळख घडत असते. आणि आपण जर काहीच नाकारलं नाही तर आपलं काही अस्तित्वच राहणार नाही.
7.आनंद ही सतत घडत राहणारी प्रक्रिया आहे कारण समस्या सोडवणं हीसुद्धा सतत घडत राहणारी गोष्ट आहे. आजच्या समस्यांवर उत्तर शोधून आपण उद्याच्या नव्या समस्यांना जन्मदेत असतो. हे असंच सुरू राहतं. खरा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा समस्या येत असताना आणि त्यांच्यावर मार्ग शोधताना तुम्ही आनंद घेऊ शकता.
8.मी म्हणतो, स्वतःचा शोध नका घेऊ. मी म्हणतो, तुम्हे ऐकोन आहात हे कधीच जाणून नका घेऊ. कारण यातूनच तुम्ही सतत धडपडत आणि शोधत राहता. आणि हीच गोष्ट तुम्हाला नम्र राहण्यासह इतरांमधलं वेगळेपण स्वीकारण्यास प्रवृत्त करते.
9.तुमच्यासाठी एक चांगली आणि एक वाईट बातमी आहे. तुमच्या अडचणींमध्ये विशेष आणि एकमेवाद्वितीय असं काही क्वचितच असतं. त्यामुळंच गोष्टींना सोडून देणं हे तुम्हाला मोकळं, स्वतंत्र करत जातं.
10.कृती ही केवळ प्रेरणेचा परिणाम नसते, तर कारणही असते.
11.आयुष्याबद्दलचं हे एक छोटंसं, विचित्र सत्य. तुम्ही काही लोकांसाठी महत्त्वाचे आणि आयुष्य बदलणारे व्यक्ती असू शकता. मात्र त्याच वेळी तुम्हाला इतरांसाठी एक विनोदाचा आणि संकोचाचा विषय बनावं लागतं.
हेही वाचा सोशल मीडियाबाबत नियम घालणारा भारत नाही पहिला देश; वाचा जगभरातले कायदे
12.जर कुठल्याही एका टप्प्यावर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला चढणं थांबवण्याची परवानगी आहे, तर मला वाटतं की तुम्ही मूळ मुद्दाच विसरलात. खरा आनंद चढण्यातच दडलेला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Personal life