फक्त जखमेवरच नाही उपयुक्त; शारीरिक वेदनांपासूनही आराम देते हळद

फक्त जखमेवरच नाही उपयुक्त; शारीरिक वेदनांपासूनही आराम देते हळद

हळदयुक्त तेलाने मालिश केल्याने तुम्हाला वेदनांपासून आराम मिळेल.

  • Last Updated: Jul 21, 2020 10:54 PM IST
  • Share this:

हळद अतिशय औषधी आहे. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितल्यानुसार, हळदीमध्ये अल्फा करक्युमिन असते. तसेच त्यात दाहकता कमी करणारे गुणसुद्धा आहेत. त्यामुळे कुठलीही जखम लवकर बरी होते. आपल्या शरीरावर कुठेही दुखापत झाली तर तर तात्काळ त्यावर हळदीचा लेप लावला तर ते ठीक होते. हळदीच्या तेलात अँटी-अॅलर्जी, अँटी-माइक्रोबाइल, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल, अँटी-पॅरासिटिक हे सर्व गुण असतात. त्यात अँटी-ऑक्सिडंटही भरपूर प्रमाणात असते. आयुर्वेदामध्ये हळदीचे अगणित फायदे नमूद करण्यात आले आहेत.

हळदीचे तेल वेदनेपासून मुक्ती देते

शरीरावर आलेल्या सुजेवर आणि सांध्यांच्या दुखण्यात हळदीचे तेल खूप उपयुक्त आहे. हळदीच्या तेलाने सांध्यावर मालिश केल्याने त्याने वेदना जातात. स्नायूंनाही मालिश केली तर त्याच्या वेदना शमतात. सूज आली असेल तर त्याठिकाणी मालिश केली की वेदना होत नाहीत. संधिवातासाठी हे तेल खूपच फायद्याचे आहे.

रक्ताभिसरण वाढवण्यात मदत करते

हळदीच्या तेलाने मालिश केल्यास शरीराचे रक्ताभिसरण चांगले होते. याने हृदयाचे आरोग्य चांगले होऊन हृदयाघात होण्याचा धोका कमी होतो.

टाचांच्या भेगा लवकर बऱ्या होतात

myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांच्या अनुसार ज्यांच्या पायांना भेगा असतात अशा लोकांना या तेलाचा खूप फायदा होतो. त्यासाठी दोन चमचे नारळाच्या तेलात हळदीच्या तेलाचे काही थेंब टाकावे, त्याला थोडे गरम करावे आणि टाचेच्या भेगांवर लावावे. त्याने टाचा नरम होतील आणि भेगा पडणार नाहीत.

केसाच्या कोंड्यापासून मुक्ती

हळदीचे तेल केसातील कोंडा घालवायला उपयोगी आहे. घरात वापरल्या जाणाऱ्या केसांच्या तेलात हळदीच्या तेलाचे दोन-तीन थेंब टाकावे, आणि त्या तेलाने रोज डोक्याला मालिश करावी. त्याने कोंडा निघून जातो.

कच्च्या हळदीच्या तेलाचे सेवन फायदेशीर

कच्च्या हळदीच्या सेवनाने हृदय विकार, मधुमेह, यकृताचे आजार यात फायदा होतो. त्याने कर्करोगासारखे आजारही बरे होऊ शकतात.

हळदी सोबत मोहरीचे तेल

हळदी सोबत मोहरीचे तेल मिसळल्याने त्याचे अँटी-ऑक्सिडंट गुण अधिक वाढतात. म्हणूनच याच्या मिश्रणाच्या सेवनाने कर्करोगासारखे आजार लवकर बरे होतात. त्यांचा आहारात समावेश असेल तर त्वचा उजळते. एक चमचा हळद आणि दोन चमचे मोहरीचे तेल एकत्र करून गरम करावे आणि त्याचे सेवन करावे, याने अनेक शारीरिक समस्या ठीक होतात.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - सकस आहार

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: July 21, 2020, 10:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading