मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /आजाराने गाठली Height! इतकी उंच वाढली महिला की झाला वर्ल्ड रेकॉर्ड

आजाराने गाठली Height! इतकी उंच वाढली महिला की झाला वर्ल्ड रेकॉर्ड

एका आजारामुळे ती बनली जगातील सर्वात उंच महिला (World's Tallest Women).

एका आजारामुळे ती बनली जगातील सर्वात उंच महिला (World's Tallest Women).

एका आजारामुळे ती बनली जगातील सर्वात उंच महिला (World's Tallest Women).

    अंकारा, 14 ऑक्टोबर : आपल्याला एखादा आजार असला की जीव नकोसा वाटतो. पण एका महिलेला अशाच आजारामुळे नावलौकीक मिळाला. ती जगात फेमस झाली आहे. तिच्या आजारामुळेच तिला विश्वविक्रम करता आला. जगातील सर्वात उंच महिला  (World's Tallest Women) म्हणून तिची  गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book Of World Record) नोंद झाली.

    तुर्कस्तानातील (Turkey) रुमेसा गेलगी (Rumeysa Gelgi) जगातील सर्वात उंच महिला ठरली आहे.  तिची उंची तब्बल 7 फूट 0.7 इंच आहे. रुमेसाच्या सर्वाधिक उंचीमागे कारण तसं दुर्देवी आहे. कारण ती एक दुर्मिळ आजाराचा (Disease) सामना करत आहे. ज्यामुळे तिची उंची इतकी वाढली आहे. पण आपल्या या आजारामुळे वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्यानं तिला खूप आनंद झाला असून, क्षणभर का होईना ती तिचा गंभीर आजार विसरल्याचं सांगते.

    हे वाचा - तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टीचं वाटतंय भय; असू शकतो Phobia, एक भीतीचा आजार

    रुमेसा जेनेटिक डिसऑर्डरचा (Weaver Syndrome) सामना करते आहे. या आजारामुळे तिची उंची सातत्यानं वाढत आहे.

    2014 मध्ये रुमेसाचं नाव सर्वाधिक उंच युवती म्हणून नोंदलं गेलं होतं. त्यानंतर ती चर्चेत आली. जास्त उंची असल्यानं रुमेसाला चालणं, फिरणं कठीण झालं आहे. त्यामुळे ती व्हिलचेअरवर बसून फिरते. रुमेसासोबत कायमस्वरूपी एक असिस्टंट असते. ही असिस्टंट तिला चालण्या-फिरण्यासाठी मदत करते.

    हे वाचा - OMG! चक्क डोक्यावर ठेवली 735 अंडी; VIDEO पाहून तोंडात घालाल बोटं

    वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नावाची नोंद झाल्यानंतर रुमेसाला आनंद झाला असला तरी या कारणामुळे तिला खूप काही सहन करावं लागलं. जास्त उंची असल्यानं तिला शाळेत, कॉलेजमध्ये लोकांकडून टोमणे ऐकावे लागले. लोकं तिला खूप काही बोलत. परंतु, या सर्व गोष्टींनी रुमेसाला अधिक धैर्यशील बनवलं. आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नावाची नोंद झाल्यानंतर रुमेसा खूप आनंदी आहे.

    First published:

    Tags: Lifestyle, Record, World record