जागतिक संकटातून त्यानं साधली सुवर्णसंधी; तयार केले सोन्या-चांदीचे अँटीबॅक्टेरिअल मास्क

जागतिक संकटातून त्यानं साधली सुवर्णसंधी; तयार केले सोन्या-चांदीचे अँटीबॅक्टेरिअल मास्क

त्याच्या या मास्कला (mask) खूप मागणी आहे.

  • Share this:

अंकारा, 28 नोव्हेंबर : जगातील अनेक मोठ्या आरोग्य संस्था आणि शास्त्रज्ञ कोरोनाविरोधातील लस शोधत आहेत. तोपर्यंत कोरोना विषाणूपासून आपला बचाव करण्यासाठी मास्क हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. मास्क (mask) हा आता आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग बनला आहे. अशातच टर्कीच्या एका शिल्पकाराने (turkish craftsman) सुरक्षिततेसाठी वापरल्या जाणाऱ्या मास्कला दागिन्याचं रूप दिलं आहे आणि त्यानं त्यांनी सोन्या-चांदीचे अँटिबॅक्टेरिअल मास्क (Gold-Silver Masks) तयार केले आहेत.

43 वर्षीय साबरी देमिर्चि एक शिल्पकार आहे.  गेल्या 32 वर्षांपासून तो  सोन्या-चांदीचं काम करत आहे. कोरोना विषाणूचा शिरकाव जगात झाला आणि लॉकडाऊन लागला अशातच त्याचं सर्व काम ठप्प झालं. त्याला त्याचं सोन्या-चांदीचं दुकान बंद करावं लागलं. लॉकडाऊनमध्ये घरी मिळालेला मोकळा वेळ त्यानं नवीन शोध लावण्यात घालवला. चांदीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंधक असणारा घटक असतो, याची माहिती त्याला मिळाली. याबाबत अधिका माहिती त्यानं मिळवली आणि मग पुढील दोन ते अडीच महिन्यांत चांदीचा मास्क तयार करण्याचे ठरवलं.

हे वाचा - कोरोना लस तयार झाल्यानंतर कसं करणार वितरण; जाणून घ्या या यंत्रणेविषयी

जून महिन्यात साबरीनं पुन्हा दुकान उघडलं आणि चांदीचा मास्क तयार करण्यास सुरुवात केली. यानंतर त्यानं चांदीप्रमाणेच सोन्याचा मास्कही तयार करायला सुरुवात केली. इंग्रजी वेबसाईट डेलिस्बाच्या वृत्तानुसार बुधवारी एका वृत्तसंस्थेशी बोलताना साबरीनं सांगितलं, पाच महिन्यांपासून मास्कचं डिझाईन आणि साच्यावर काम केलं आणि आता ॲंटीबॅक्टरियल सिल्व्हर मास्क तयार करण्यास सुरुवात करत आहे.

या वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार साबरीचं आठवड्याचं उत्पादन हे दीडशे ते दोनशे मास्कदरम्यान असतं. हे मास्क कपड्यानं स्वच्छसुद्धा केलं जाऊ शकतं, हे मास्क डिस्पोजेबल नाही. मात्र महासाथ संपल्यानंतरही विकलं जाऊ शकतं.

Published by: Priya Lad
First published: November 28, 2020, 10:55 PM IST

ताज्या बातम्या