बापरे! तासनतास बसून व्यक्तीच्या पाठीत झाली गाठ; WORK FROM HOME चा गंभीर दुष्परिणाम

बापरे! तासनतास बसून व्यक्तीच्या पाठीत झाली गाठ; WORK FROM HOME चा गंभीर दुष्परिणाम

अनेक महिन्यांपासून या व्यक्तीला पाठदुखीची समस्या होती. जी कोरोना लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम करताना अधिक बळावली.

  • Share this:

मुंबई, 25 जून : लॉकडाऊनमुळे (LOCKDOWN) सध्या अनेक लोक वर्क फ्रॉम होम (WORK FROM HOME) करत आहेत.  घरी असल्याने कामाचे तासही वाढले. तासनतास लोकं लॅपटॉप, कॉम्प्युटरसमोर बसून राहत आहेत. यामुळे अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. मान आणि पाठदुखीची (BACK PAIN) समस्या बळावली आहे आणि याचा गंभीर दुष्परिणाम मुंबईतील एका व्यक्तीला भोगावा लागतो आहे. या व्यक्तीच्या मणक्यात गाठ (TUMOR) झाली.

40 वर्षांचे भूपेश अंकोलेकर अभियंता आहेत. बैठ्या जीवनशैलीमुळे त्यांना अनेक महिन्यांपासून पाठदुखीची समस्या जाणवत होती आणि  लॉकडाऊनमध्ये घरीच बसून काम करावे लागत असल्याने पाठीचे दुखणे अधिकच वाढू लागले. वैद्यकीय चाचणीत त्यांच्या पाठीत गाठ असल्याचं निदान झालं.

मिरारोडच्या वोक्टार्ट रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून मणक्यातील गाठ काढण्यात आली तब्बल 3.5 सेंटिमीटर इतकी मोठी ही गाठ होती.

रुग्णालयातील तज्ज्ञ सल्लागार आणि ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. गिरीश भालेराव यांनी सांगितलं, ‘‘पाठीच्या कण्यातील ही गाठ हाडाच्या आत होती. मज्जातंतूला नुकसान होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे शस्त्रक्रिया करणं खूपच अवघड होतं. मात्र डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारून मायक्रोस्क्रोपीद्वारे (दुर्बिणी) प्रक्रिया करून पाठीच्या मणक्यातील ही गाठ यशस्वीरित्या काढली. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला पाठीच्या दुखण्यातून कायमस्वरूपी सुटका मिळाली आहे.’’

हे वाचा - फक्त गॅस, हवेच्या मदतीने महिलेने दिला 5 किलो बाळाला जन्म; टाक्यांचीही पडली नाही

तर कन्सल्टंट न्यूरोसर्जन डॉ. अश्विन बोरकर म्हणाले, ‘‘पाठीच्या कण्यातून गाठ काढणे ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असते. साधारणतः चार तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. या शस्त्रक्रियेनुसार रुग्ण शुद्धीवर आल्यावर कुठल्याही प्रकारची वेदना जाणवत नाही. दोन तासांनंतर तो दैनंदिन आयुष्य जगू शकतो. या रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर तीन दिवसांनी घरी सोडण्यात आले आहे. आता या रुग्णाची प्रकृती ठणठणीत असून तो नियमित कामे करू लागला आहे."

हे वाचा - GOOD NEWS : कोरोना लसीचं अंतिम ट्रायल; यशस्वी झाल्यास याच वर्षात येणार लस

ही गाठ काढल्यानंतर रुग्णाने आपल्या पाठीतील दुखणंही बंद झाल्याचं सांगितलं.

रुग्ण भूपेश अंकोलेकर म्हणाले की, ‘‘पाठीच्या मणक्यात ट्युमर(गाठ) असल्याचे निदान झाल्याने कुटुंबियांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. शस्त्रक्रियेद्वारे गाठ काढणे हा एकच पर्याय होता. त्यानुसार डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे ही गाठ काढली. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे आता मला या पाठीच्या दुखण्यातून सुटका मिळाली आहे. आता मी पूर्वीप्रमाणे आयुष्य जगू शकतोय.’’

हे वाचा - Fair & Lovely तून 'फेअर' होणार गायब; 45 वर्षांनी कंपनीने घेतला मोठा निर्णय

जी वेळ भूपेश यांच्यावर ओढावली ती तुमच्यावर येऊ देऊ नका. घरातून काम करताना बसताना योग्य ती काळजी घ्या. पाठीवर, मानेवर ताण येऊ देऊ नका. कामातून ब्रेक घेऊन थोडी शारीरिक हालचाल करा. जागच्या जागीदेखील का्ही मिनिटांचे व्यायाम तुम्ही करू शकता. जेणेकरून असा मोठा धोका टाळता येईल.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: June 25, 2020, 9:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading