मुंबई, 03 ऑक्टोबर : हिंदू धर्मात तुळशीला (tulsi) देवी लक्ष्मीचे रूप मानलं जातं. असं मानलं जातं की ज्या घरात तुळशीची नियमित पूजा केली जाते, त्या घरात दुःख आणि गरिबी कधीही प्रवेश करत नाही. अश्विन महिन्यात घरात तुळशीची लागवड केल्यास घरात सुख आणि समृद्धी येते. तुळशीची पूजा विशेषतः कार्तिक महिन्यात केली जाते. वास्तुशास्त्रातही तुळशीला विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्त्रात तुळशीची वनस्पती (tulsi to remove vastudosha) सकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानली जाते. असं मानलं जाते की घरात तुळशीचा रोप ठेवल्यानं घरातील वास्तू दोषही दूर होतात. पण घरात तुळशीचे रोप लावण्यासाठी काही नियम आहेत, त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
1- वास्तुशास्त्रानुसार घरात तुळशीचे रोप लावण्यासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे ईशान्य दिशेला कुठेही घराच्या आवारात लावता येईल.
2 - तुळशी जी कधीही जमिनीवर लावू नये, उंच ठिकाणी किंवा भांड्यात लावावी.
3- तुळशीचे रोप छतावर लावणे वास्तुशास्त्रात चांगले मानले जात नाही. असे मानले जाते की असे केल्याने तुळशीची सकारात्मक ऊर्जा घरात राहत नाही.
हे वाचा - या वाईट सवयी मुलाचे आयुष्य कायमचे खराब करू शकतात; पालकांनी ही खबरदारी घ्यावीच
4- तुळस हिंदु धर्मात अत्यंत आदरणीय मानली जाते, म्हणून हे लक्षात ठेवा की जेथे तुम्ही तुळशीचे रोपण कराल, ती जागा स्वच्छ ठेवा आणि शूज किंवा चप्पल त्या ठिकाणापासून दूर ठेवा.
5- जर घराच्या आवारात एकापेक्षा जास्त तुळशीची रोपटी असतील तर लक्षात ठेवा की ती 3,5,7 च्या विषम संख्येत असावीत. 2,4,6 तुळशीची एकसमान संख्या असणे शुभ मानले जात नाही.
6- तुळशीच्या झाडाला सुकू देऊ नये, हे शुभ चिन्ह मानलं जात नाही.
हे वाचा -लक्ष्मी आणि सरस्वती दोघी एकत्र नांदाव्यात असं वाटत असेल तर घरात ठेवा ही वस्तू
7- तुळशीच्या रोपाला दररोज पाणी अर्पण करणे आणि संध्याकाळी त्याच्या जवळ शुद्ध तुपाचा दिवा लावणे घरात सुख आणि समृद्धी आणते.
(सूचना : ही माहिती विविध स्त्रोत आणि वास्तुशास्त्रानुसार मिळवलेली आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.