मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Tulsi Tea Benefits: सकाळी उठल्यानंतर तुळशीचा चहा पिण्याचे आहेत असंख्य फायदे, जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत

Tulsi Tea Benefits: सकाळी उठल्यानंतर तुळशीचा चहा पिण्याचे आहेत असंख्य फायदे, जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत

Benefits Of Drinking Tulsi Tea : तुळशीचा प्रत्येक भाग आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, झिंक, लोह, क्लोरोफिल, फायबर असे घटक असतात, ज्याची आरोग्यासाठी गरज असते. यासाठी आपण सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचा चहा (Tulsi Tea) प्यायलो तर त्याचा आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदो होतो.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 19 डिसेंबर : भारतातील बहुतेक घरांमध्ये आपल्याला तुळशीची रोप दिसेल. तुळशीला जेवढे धार्मिक महत्त्व आहे, तेवढेच आयुर्वेदातही अतिशय उपयुक्त औषध म्हणून तुळस (Tulsi) वापरली जाते. तुळशीचा औषधासाठी हजारो वर्षांपासून वापर केला जात आहे. आयुर्वेदात रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी देखील तुळशीचा वापर (Benefits Of Drinking Tulsi Tea) केला जातो.

हेल्थलाइनच्या माहितीनुसार, तुळशीचा प्रत्येक भाग आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, झिंक, लोह, क्लोरोफिल, फायबर असे घटक असतात, ज्याची आरोग्यासाठी गरज असते. यासाठी आपण सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचा चहा (Tulsi Tea) प्यायलो तर त्याचा आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदो होतो.

असा बनवा तुळशीचा चहा

एका भांड्यात एक ग्लास पाणी उकळा.

त्यात तुळशीची थोडी पाने टाका.

आता हे पाणी अर्धे होईपर्यंत उकळू द्या.

आता गॅस बंद करा.

एका कपात घाळून घ्या.

चवीनुसार मध आणि लिंबू घालून प्या.

इतर फायदे जाणून घ्या

1. तणाव दूर होतो

हा चहा आपण रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास दिवसभरातील ताण-तणाव कमी होऊ शकतो. इतकेच नाही तर याच्या सेवनाने निद्रानाश, विस्मरण, थकवा आदी समस्याही हळूहळू नाहीशा होतात.

2. पचन व्यवस्थित होते

तुम्हाला पचनाची समस्या असेल तर हा चहा तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. सकाळी या चहाचे नियमित सेवन केल्यास पोटशूळ, जडपणा आणि मळमळ यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते.

हे वाचा - White Hair : पांढऱ्या केसांवर हा घरगुती उपाय आहे जबरदस्त, गुळासोबत खा हा पदार्थ

3. प्रतिकारशक्ती वाढते

तुळशीचा चहा नियमित प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली काम करते. त्यामुळे हंगामी फ्लू, खोकला, सर्दी इत्यादीमध्ये आराम इतकेच नाही तर त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटी फंगल, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत. हे पेनकिलरसारखेही काम करते.

हे वाचा - तुम्ही टॉयलेटमधून आल्यानंतर लगेच पाणी पिता का? हेल्थवर होऊ शकतो उलटा परिणाम

4. रक्तातील साखरेची पातळी

तुळशीचा चहा प्यायल्याने टाइप-2 मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो. संशोधनात असे आढळून आले आहे की, तुळशीच्या पानांचे नियमित सेवन केल्यास 30 दिवसांत रक्तातील साखरेची पातळी 26.4 टक्क्यांनी कमी होऊ शकते.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips