मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Tulasi Seeds : तुळशीची फक्त पानंच नाही तर बियाही असतात फायदेशीर! अशाप्रकारे करा आहारात सामील

Tulasi Seeds : तुळशीची फक्त पानंच नाही तर बियाही असतात फायदेशीर! अशाप्रकारे करा आहारात सामील

तुळशीच्या बिया ज्याला सब्जा बियादेखील म्हणतात, यासुद्धा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तुळशीच्या बिया पोषक तत्वांचा उत्कृष्ट स्रोत आहे.

तुळशीच्या बिया ज्याला सब्जा बियादेखील म्हणतात, यासुद्धा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तुळशीच्या बिया पोषक तत्वांचा उत्कृष्ट स्रोत आहे.

तुळशीच्या बिया ज्याला सब्जा बियादेखील म्हणतात, यासुद्धा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तुळशीच्या बिया पोषक तत्वांचा उत्कृष्ट स्रोत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 7 फेब्रुवारी : भारतीय आयुर्वेदात तुळशीला खूप महत्त्व आहे. औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेल्या तुळशीचा वापर रोगप्रतिकारशक्ती वाढवून अनेक गंभीर आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी खूप प्रभावी आहे. त्याच वेळी तुळशीच्या बिया ज्याला सब्जा बियादेखील म्हणतात, यासुद्धा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. तुळशीच्या बिया पोषक तत्वांचा उत्कृष्ट स्रोत आहे.

तुळशीच्या बियांमध्ये प्रोटिन्स, हेल्दी फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. या तुळशीच्या बिया हुबेहुब चिया सीड्ससारख्या दिसतात, याला पाहून अनेकदा लोक संभ्रमात पडतात. मात्र तुळशीच्या बियांमध्ये चिया सीड्सपेक्षा जास्त प्रमाणात प्रोटिन्स असतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या बियांमध्ये कॅलरी अजिबात नसतात. आज आपण तुळशीच्या बियांच्या फायद्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

जेवण केल्यानंतर लगेच अंघोळ करणे योग्य आहे का? पाहा आरोग्यावर कसा होतो परिणाम

तुळशीच्या बियांचे आरोग्य फायदे

रोग प्रतिकारशक्ती : उत्तम आरोग्यासाठी रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे खूप आवश्यक असते. रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर आपले अनेक रोग आणि संक्रमणांपासून संरक्षण होते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हल्ली लोक खूप वेगवेगळे उपाय करतात. यासाठीच तुम्ही तुळशीच्या बियांचा काढा बनवून ते पिऊ शकता.

पचनक्रिया : काही लोकांना कायम बद्धकोष्ठतेचा त्रास असतो. जर तुम्हालाही बद्धकोष्ठता, अॅसिडिटी किंवा गॅसची समस्या असेल. तर तुळशीच्या बिया तुमच्यासाठी वरदान आहेत. तुळशीच्या बिया पाण्यात टाकून त्या काही काळ भिजत ठेवा. यानंतर जेव्हा त्या फुगतील. तेव्हा हे मिश्रण प्या. यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते आणि तुम्हाला पोटाच्या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते.

वजन कमी करणे : ज्यांचे वजन खूप वाढलेले आहे आणि त्यांना वजन कमी करायचे आहे. त्यांच्यासाठी तुळशीच्या या बिया उत्तम उपाय आहेत. कारण तुळशीच्या बियांमध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. या बिया खाल्ल्याने जास्त वेळ भूक लागत नाही आणि तुम्ही जास्त खाणे टाळता. यामुळे वजन हळूहळू कमी होऊ लागते.

तणाव दूर होतो : हल्लीच्या काळात मानसिक ताणतणाव ही खूप सामान्य समस्या झाली आहे. मात्र यासाठी तुळशीच्या बिया तुमची मदत करू शकतात. मानसिक तणाव कमी करण्यासाठी तुळशीच्या बियांचे सेवन खूप फायदेशीर ठरते. हे तुम्हाला डिप्रेशनपासूनही दूर ठेवेल.

Street Food खाऊनही बिघडणार नाही तुमचं आरोग्य; फक्त या 3 बेसिक गोष्टी फॉलो करा

कसे आणि किती प्रमाणात करावे सेवन

तुळशीच्या बिया पाण्यात भिजवणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. 1-2 चमचे सब्जा म्हणजेच तुळशीच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवा किंवा ज्यावेळी तुम्हाला त्याचे सेवन करायचे आहे त्याच्या 20 मिनिटे आधी भिजवा आणि दररोज प्या. तुम्ही या बिया इतर कोणत्याही पेयात मिसळून पिऊ शकता. तुम्हाला हवे असल्यास ते मिल्क शेकमध्ये किंवा कोणत्याही फळांच्या रसात मिसळून पिऊ शकता.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:

Tags: Health Tips, Lifestyle