दातांच्या दुखण्यानं त्रासलात? हे घरगुती उपाय नक्की करून पाहा

दातांच्या दुखण्यानं त्रासलात? हे घरगुती उपाय नक्की करून पाहा

सर्दी खोकल्यासोबतच अनेकदा कान आणि दातांची दुखणी सुरू होतात.

  • Share this:

मुंबई, 19 जुलै : पावसाळ्यात अनेक आजार पसरतात आणि त्यासोबत अनेक जुनी-नवी दुखणीही डोकं वर काढतात. सर्दी खोकल्यासोबतच अनेकदा कान आणि दातांची दुखणी सुरू होतात. दातांच्या दु:खण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. जसे कुठल्याही प्रकारच्या संसर्गामुळे, मधुमेहामुळे किंवा दातांची योग्य काळजी न घेतल्याने दातांच्या समस्या येऊ शकतात. जर तुम्हीही दातांच्या दुखण्यामुळे हैराण झाले असाल तर त्यावर काही घरगुती उपाय

तुम्हाला नूडल्स आवडतात का? अति नूडल्स खाणं पडेल महागात

हिंग

दाताच्या दु:खण्यावर रामबाण घरगुती उपाय म्हणजे हिंग. हिंग साधारणत: सगळ्यांच्याच घरी उपलब्ध असतं.

उपचारासाठी चिमुटभर हिंग घ्या. त्याला मोसंबीच्या रसात मिसळा. या मिश्रणात कापूस भिजवा आणि भिजलेला कापूस दुखणाऱ्या दाताजवळ पकडा. याने आपल्या दातांचं दुखणे कमी होईल. हा घरगुती उपाय खूप सोपा आणि प्रभावी आहे.

लवंग

लवंगामध्ये औषधी गुण असतात. ज्यामुळे जंतू आणि इतर जीवाणू नष्ट होतात. लवंग दुखणाऱ्या दाताजवळ पकडा. त्यामुळे दाताचे दुखणे कमी होते. परंतु दुखण कमी होण्यासाठी वेळ लागतो.

या घरगुती उपायांनी निरोगी ठेवा तुमची किडनी

कांदा

जे लोक रोजच्या रोज कच्चा कांदा खातात ते दाताच्या दुखण्यापासून दूर राहतात. जर तुम्हाला दातांचे दुखणे असेल तर कांद्याचे तुकडे दाताजवळ धरा किंवा कांदा चावून खा. असं केल्याने काही वेळातच तुम्हाला आराम मिळेल.

लसूण

लसूणही दाताच्या दुखण्यासाठी आरामदायी आहे. कच्च्या लसणाच्या दोन-तीन पाकळ्या दाताने चावा. लसूण कापूनही दाताजवळ पकडू शकता. लसणामध्ये एलिसीन असतं जे आपल्या दातातील जंतू नष्ट करतात आणि दाताला आराम मिळतो.

नवीन रिलेशनशिपमध्ये आहात तर चुकूनही करू नका हे काम, होईल ब्रेकअप

============================================================

VIDEO : रोडरोमिओला तरुणीने दाखवला नागपुरी झटका, आता परत करणारा नाही हिंमत!

First published: July 20, 2019, 9:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading