मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Skin care : दररोज प्या हे 3 Drinks; हिवाळ्यातही त्वचा मुलायम आणि टवटवीत राहिल

Skin care : दररोज प्या हे 3 Drinks; हिवाळ्यातही त्वचा मुलायम आणि टवटवीत राहिल

हिवाळ्यात शरीराला हायड्रेशनपासून वाचवायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात काही पेयांचा समावेश करू शकता. जाणून घेऊया अशा काही पेयांविषयी ज्यामुळे तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यास मदत होईल.

हिवाळ्यात शरीराला हायड्रेशनपासून वाचवायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात काही पेयांचा समावेश करू शकता. जाणून घेऊया अशा काही पेयांविषयी ज्यामुळे तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यास मदत होईल.

हिवाळ्यात शरीराला हायड्रेशनपासून वाचवायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात काही पेयांचा समावेश करू शकता. जाणून घेऊया अशा काही पेयांविषयी ज्यामुळे तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यास मदत होईल.

नवी दिल्ली, 31 डिसेंबर : थंडीच्या मोसमात (Winter health) प्रत्येकाचा खाण्यापिण्याचा छंद वाढतो. जे लोक फिटनेसची विशेष काळजी घेतात, त्यांचे खाण्यापिण्याचे वेळापत्रक या काळात गडबडते. त्याचा मग आरोग्यावर परिणाम होतो. यामुळेच हिवाळ्यात आरोग्यासोबतच त्वचेवर सर्वाधिक परिणाम होतो. हिवाळ्याच्या काळात आपली त्वचा खूप कोरडी आणि रुक्ष होते. या आल्हाददायक वातावरणात तापमानात घट झाल्यामुळे हवेतील ओलावा कमी होतो आणि आपल्या त्वचेचे निर्जलीकरण (Winter Skin care tip) होते.

थंडीच्या मोसमात (Winter session) त्वचा चांगली ठेवायची असेल, तर स्वत:ला हायड्रेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही खास गोष्टींचा समावेश करू शकता, ज्यामुळे तुमची त्वचा आणि आरोग्य दोन्हीची काळजी घेता येईल. तुम्हाला शरीराला हायड्रेशनपासून वाचवायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात काही पेयांचा समावेश करू शकता. जाणून घेऊया अशा काही पेयांविषयी ज्यामुळे तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यास मदत होईल.

त्वचेला मॉइश्चराइज ठेवण्यासाठी या पेयांचे सेवन करा:

1. आवळा रस

हिवाळ्यात आवळ्याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आवळ्याला सुपरफूड मानलं जातं. हिवाळा आणि उन्हाळा अशा दोन्ही ऋतूत त्याचा आहारातील समावेश फायदेशीर ठरतो. हिवाळ्यात आवळ्याचा ज्यूस प्यायल्यास त्यातील पोषक तत्वांमुळे त्वचा निरोगी राहते. आवळ्याच्या रसामध्ये आढळणारी पोषकतत्वे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.

2. हळद दूध

हिवाळ्यात हळदीचे दूध पिणं देखील रामबाण औषधापेक्षा कमी नाही. खरं तर, हळदीमध्ये दाहक-विरोधी आणि अँटी-मायक्रोबियल सारखे गुणधर्म असतात. ज्यामुळे या ऋतुमध्ये त्वचेला अनेक संक्रमणांपासून संरक्षण मिळू शकतं. यामुळे हिवाळ्यामध्ये आहारात हळदीच्या दुधाचा नक्कीच समावेश करावा.

हे वाचा - Bathroom Stroke: हिवाळ्यात अंघोळ करताना होणारी ही चूक ठरू शकते जीवघेणी; बाथरूम स्ट्रोकबद्दल माहीत आहे का?

3. ग्रीन टी

तंदुरुस्त राहण्यासाठी ग्रीन टी हे नेहमीच सर्वोत्तम पेय मानले गेले आहे. याचे सेवन केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. ग्रीन टीमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स त्वचेला निरोगी ठेवण्याचे काम करतात.

हे वाचा - लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Health, Lifestyle, Skin, Skin care, Winter