मुंबई, 30 डिसेंबर : हिवाळा ऋतू अनेकांसाठी चांगला असला तरी काहींना तो त्रासदायक ठरतो. साधारणपणे थंडी वाढली की रक्ताभिसरण (blood circulation) वाढते. कारण शरीराला महत्त्वाच्या अवयवांना (Vital organ) जास्त उष्णता द्यावी लागते. या प्रक्रियेत शरीराला अधिक ऊर्जेची (Energy) गरज भासते. या ऊर्जेने शरीर आपल्या आवश्यक अवयवांना उबदार ठेवण्यास सक्षम राहते. जेव्हा शरीराला जास्त ऊर्जेची गरज असते, तेव्हा आपल्याला जास्त भूक (appetite) जाणवते.
यामुळेच हिवाळ्यात खाण्याकडे आपला कल जास्त असतो. अति आहारामुळे लठ्ठपणा वाढणे कॉमन आहे. याकाळात जे आधीच लठ्ठ आहेत त्यांच्यासाठी अधिक समस्या आहेत. ज्यांचे वजन कमी आहे, त्यांनाही वजन वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे हिवाळ्यात खाण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही काही वेगळ्या हेल्दी गोष्टींचा आहारात समावेश केला तर तुमची भूक नियंत्रणात राहते आणि अनेक आजारांपासून तुमचा (Healthy Soups for weight loss) बचाव होतो.
तुम्हाला हिवाळ्यात तुमचे वजन नियंत्रित करायचे असेल किंवा वजन वाढू द्यायचे नसेल तर तुम्ही सूपचा आहारात समावेश करा. यामुळे भूक कमी होईल आणि लठ्ठपणाही वाढणार नाही. TOI च्या बातमीनुसार, असे काही सूप आहेत, ज्यामुळे भूक कमी होते आणि लठ्ठपणावर नियंत्रण ठेवता येते.
हे सूप प्या
फुलकोबी सूप
फुलकोबी ही हिवाळ्यात लोकांची आवडती भाजी आहे. या हंगामात ती स्वस्तातही उपलब्ध असते. फुलकोबी ही पोषक तत्वांनी समृद्ध असलेली भाजी आहे. यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात आढळतात. फुलकोबीमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट आढळतात, जे अनेक रोगांपासून संरक्षण करण्यासाठी प्रभावी आहेत. फुलकोबी सूपमधून खूप कमी कॅलरीज मिळतात. म्हणूनच, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर फुलकोबी तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकते. 100 ग्रॅम फुलकोबीच्या सूपमध्ये फक्त 25 कॅलरीज आढळतात.
मशरूम सूप
मशरूम सूप चवीला चांगले असते. या सूपमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आढळतात, जी शरीरातील उर्जेची कमतरता पूर्ण करतात. याशिवाय अनेक प्रकारच्या पोषक तत्वांमुळे मशरूम सूप फायदेशीर ठरते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मशरूम सूपमध्ये कॅलरी खूप कमी असतात आणि जवळजवळ चरबी नसते. म्हणूनच, तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर मशरूम सूप तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
हे वाचा - फक्त सुगंधाला भुलू नका; Deodorant खरेदी करताना या गोष्टींची खात्री करा अन् मगच पैसे द्या
टोमॅटो सूप
हिवाळ्यात वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर टोमॅटो सूप प्या. टोमॅटो सूपमध्ये व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन आढळतात. त्यामध्ये अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स असतात. टोमॅटोच्या सूपमध्ये फॅट अजिबात नसते आणि कॅलरीजही खूप कमी असतात. अनेक प्रकारच्या खनिजांमुळे विविध आजारांपासून आपले संरक्षण होते. मात्र, टोमॅटो सूपमध्ये जास्त फॅट असलेल्या गोष्टी टाकू नये, त्यामुळे त्याचे फायदे कमी होतील. टोमॅटो सूपमध्ये सहसा लोक मलई आणि साखर घालतात. त्यामुळे चव चांगली येते मात्र, कॅलरीज वाढतात. त्यामुळे या वस्तुंचे प्रमाण जितके कमी तितके आरोग्यासाठी चांगले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fitness, Health, Lifestyle, Weight, Weight loss tips