जननेंद्रिय (private part) संसर्गाची अनेक कारणं असू शकतात. पुरुषांमध्ये जननेंद्रियातील संसर्गामुळे जखम, जळजळ किंवा खाज सुटणं अशी लक्षणं दिसून येतात. myupchar.com चा नुसार, संसर्गाची समस्या बहुतेक स्वच्छतेची काळजी न घेतल्यामुळे होते. यासाठी आंघोळ करताना आपलं गुप्तांग चांगलं धुणं महत्त्वाचे आहे. अंतर्वस्त्र ओले घालू नका, ते नीट सुकलेले आहेत, याची खबरदारी घ्या आणि गुप्तांग कोरडं ठेवण्याचा प्रयत्न करा. पुरुषांच्या जननेंद्रियात दीर्घकाळ ओलावा राहिल्यामुळे संसर्गाची समस्या उद्भवते. त्यामुळे सैल कपडे घालण्याचा प्रयत्न करा.
संसर्ग असल्यास डॉक्टरांना सांगणं फार महत्त्वाचं आहे. त्यावर वेळीच उपचार न घेतल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. मात्र संसर्गाची सुरुवातीची लक्षणं काही घरगुती उपचारांनी बरे करता येतात. या उपायांबद्दल जाणून घेऊयात.
दही
दह्यामध्ये चांगले जीवाणू तसेच अँटी-फंगल गुणधर्म असतात. यासाठी दह्याचं नियमित सेवन करावं. त्यानं कोणताही संसर्ग होत नाही. यामुळे शरीरास शीतलताही मिळते. दही तुम्ही लेप म्हणून देखील वापरू शकता. सर्वात आधी संक्रमित भाग स्वच्छ पाण्यानं धुवा आणि स्वच्छ कापडानं पुसून घ्या. आता जननेंद्रिय आणि त्याच्या सभोवताली जीवाणू युक्त दह्याचा एक वाटी लेप लावा. कोरडं होईपर्यंत ते तसंच राहू द्या. नंतर कोमट पाण्यानं धुवा. दिवसातून दोनदा या पद्धतीचे अनुसरण करा. काही दिवसात संक्रमण नष्ट होईल.
टी ट्री ऑईल
टी ट्री ऑईलमध्ये अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म आहेत. याद्वारे पुरूषांचं जननेंद्रिय किंवा इतर कोणत्याही अवयवावरील संक्रमण दूर होतं. जननेंद्रिय चांगलं धुवून स्वच्छ करा. टी ट्री ऑईलने हलक्या हातांनी मालिश करा. नियमितपणे ही प्रक्रिया दोन ते तीन वेळा करा यामुळे लवकरच संसर्ग कमी होईल.
अॅपल सिडर व्हिनेगर
myupchar.com च्या नुसार, त्वचेच्या कोणत्याही समस्येसाठी अॅपल व्हिनेगर हे एक चांगलं औषध आहे. याचा उपयोग जननेंद्रिय संक्रमण काढून टाकण्यासाठीदेखील केला जाऊ शकतो. जननेंद्रिय स्वच्छ करून त्यावर व्हिनेगर लावा. व्हिनेगर थेट वापरू नका त्यात थोडं पाणी घाला नाहीतर जळजळ उद्भवेल. दिवसातून दोनदा ही प्रक्रिया करा. जळजळ जाणवत असेल तर लगेच पाण्याने धुवा आणि हा उपाय करू नका.
अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - घरगुती उपाय
न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.