मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /हिवाळ्यात सर्दी-खोकल्यानं केलंय त्रस्त? अवलंबा 'हे' 6 उपाय, त्वरित मिळेल आराम

हिवाळ्यात सर्दी-खोकल्यानं केलंय त्रस्त? अवलंबा 'हे' 6 उपाय, त्वरित मिळेल आराम

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

हवामान, ऋतुबदल, अॅलर्जी ( allergies), व्हायरल इन्फेक्शन ( viral infections) किंवा जिवाणू संसर्गामुळे (bacterial infections) घराघरात सर्दी आणि खोकल्याची (Cold And Cough) समस्या दिसून येते. कधी थंड (Winter) हवेच्या संपर्कात आल्यामुळे, तर कधी थंडी वाजल्यामुळे ही समस्या सुरू होते.

पुढे वाचा ...

  मुंबई,18  नोव्हेंबर-  हवामान, ऋतुबदल, अॅलर्जी  ( allergies),  व्हायरल इन्फेक्शन  ( viral infections)  किंवा जिवाणू संसर्गामुळे  (bacterial infections) घराघरात सर्दी आणि खोकल्याची  (Cold And Cough)  समस्या दिसून येते. कधी थंड  (Winter)  हवेच्या संपर्कात आल्यामुळे, तर कधी थंडी वाजल्यामुळे ही समस्या सुरू होते. 'वेबएमडी'च्या मते, खोकला आणि सर्दी ही खरं तर शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जो शरीरातून विषाणू आणि बॅक्टेरिया बाहेर काढण्याचा एक मार्ग आहे. कधीकधी विषाणू शरीरात प्रवेश करतात आणि ते म्युकसमध्ये जमा होतात. ते शरीराच्या बाहेर काढण्यासाठी सर्दी-खोकला होतो. तुम्ही अशा वेळी औषध घेण्याऐवजी शरीराला नैसर्गिक पद्धतीने काम करू दिलं, तर त्याचे दूरगामी परिणाम चांगले राहतात. तसंच घरगुती उपायांच्या  (Home Remedies)  मदतीने तुम्ही खोकला आणि सर्दीपासून आराम मिळवू शकता. हे उपाय नेमके कोणते आहेत, ते जाणून घेऊ या.

  1. कोमट पाण्याने गुळण्या करा
  कोमट पाण्यात एक चमचा मीठ घाला आणि दिवसातून 3 ते 4 वेळा गुळण्या करा. असं केल्याने सर्दी, खोकला आणि घसादुखीपासून आराम मिळेल आणि घशातली सूज कमी होईल.

  2. मीठ मिसळलेल्या पाण्याचे थेंब नाकात टाका
  एका कपमध्ये स्वच्छ पाणी घ्या आणि त्यात मीठ मिसळा. आता ड्रॉपरच्या मदतीने त्या पाण्याचे दोन थेंब नाकात टाका. दिवसातून 2 ते 3 वेळा असं केल्यास म्युकस ड्रेन होण्यास मदत होते.

  3. लसूण भरपूर खा
  हिवाळ्यात दररोज लसूण खाल्ल्याने सर्दीपासून बचाव होतो. कच्ची लसूण खाणे अधिक उत्तम.

  4. चिकन सूप प्या
  सर्दी आणि खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी दररोज दोन ते तीन कप चिकन सूप प्या. यामुळे घशातल्या वेदना आणि सूज कमी होण्यासोबतच प्रतिकारशक्ती वाढेल.

  5. आल्याचा चहा प्या
  आल्याचा चहा सर्दी आणि खोकल्याच्या उपचारांसाठी मदत करतो. या चहामुळे कफ कोरडा होण्यास आणि तो शरीरातून बाहेर पडण्यास मदत होते.

  6. हळद दूध
  कोमट दुधात हळद मिसळून प्यायल्यास सर्दी आणि खोकल्याशी लढण्यास मदत होते. झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात हळद मिसळून प्या. सर्दी आणि खोकल्यापासून लवकर आराम मिळेल.

  हिवाळ्यात गार हवा वाहायला सुरू झाल्यावर सर्दी, खोकला यांचीही साथ येते. थंडीच्या दिवसांमध्ये सर्दी, खोकला लोकांना चांगलाच त्रस्त करतो; पण आपण वेळीच घरगुती उपाय केल्यास सर्दी व खोकल्यापासून आराम मिळण्यास मदत होते.

  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle, Winter session