तरुण वयात पांढरे केस; डाय नाही तर घरगुती उपायांनी काळे करा केस

तरुण वयात पांढरे केस; डाय नाही तर घरगुती उपायांनी काळे करा केस

केस पांढरे (grey hair) झाल्यावर डाय, रासायनिक रंग वापरले जातात मात्र अगदी घरगुती उपायांनीदेखील केस काळे करता येऊ शकतात.

  • Last Updated: Sep 16, 2020 02:53 PM IST
  • Share this:

वयानुसार केसांचे पांढरे होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. केसांना रंग देणाऱ्या मेलेनिनचे उत्पादन वयानुसार कमी होते आणि त्यामुळे केस पांढरे होण्याची प्रक्रिया सुरू होते. कमी वयात केस पांढरे होणे ही एक मोठी समस्या बनली आहे. हार्मोनल आणि पर्यावरणीय कारणांमुळे केस पांढरे होण्याची समस्या अगदी लहान वयातच सुरू होते. आनुवांशिक घटक, हायपोथायरॉईडीझम, प्रथिनां कमतरता, खनिजांची कमतरता, जीवनसत्त्वांची कमतरता, त्वचारोग, ताणतणाव, औषधांचा दुष्परिणाम या गोष्टी यासाठी कारणीभूत ठरतात. महिला किंवा पुरुष दोघांनाही ही समस्या उद्भवते.

myupchar.com चे डॉ. अप्रतिम गोयल म्हणतात की, जेव्हा एखाद्या व्यक्तीला पित्ताचा म्हणजेच शरीराच्या उष्णतेचा त्रास होतो, तर हाच त्रास केस पांढरे होण्यास कारण ठरू शकतो.

केस पांढरे झाल्यावर डाय, रासायनिक रंग वापरले जातात मात्र अगदी घरगुती उपायांनीदेखील केस काळे करता येऊ शकतात.

तांबे समृद्ध आहार

कधीकधी आहारात तांबे नसल्यामुळे केस पांढरे होण्यास सुरवात होते. आयुर्वेदानुसार तांबे युक्त आहार पांढर्‍या केसांसाठी चांगला असतो. myupchar.com च्या डॉ.मेधवी अग्रवाल यांनी सांगितलं की, शरीरात मेलेनिन तयार होण्यास तांबे महत्वाची भूमिका निभावते. मेलेनिन हे त्वचेच्या रंगासाठीच नाही तर केसांच्या रंगासाठी देखील आवश्यक आहे. मशरूम, काजू, तीळ, बदाम, डाळी, अॅवोकॅडो, मनुका, संपूर्ण धान्य, सोयाबीन, हिरव्या पालेभाज्या, मांस, काळी मिरी इत्यादींचा आहारात समावेश करा.

भृंगराज

भृंगराज केसांच्या वाढीस प्रोत्साहित करते आणि केस काळे, चमकदार बनवते. हे केस पांढरे होण्यापासून प्रतिबंधित करते. तसेच मेंदू शांत राहण्यास मदत करते.

आवळा पावडर आणि नारळाचे तेल

एका भांड्यात 2 चमचे आवळा पावडर आणि 3 चमचे नारळाचे तेल घ्या आणि पावडर वितळेपर्यंत गरम करा. तेल थंड झाल्यावर केसांच्या मुळांवर लावून चांगली मालिश करा. रात्रभर आपल्या केसात ते राहू द्या. आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा ही प्रक्रिया पुन्हा करा.

मोहरीचे तेल आणि एरंडेल तेल

1 चमचे एरंडेल तेल आणि 2 चमचे मोहरीचे तेल एकत्रित करून मिसळा आणि काही सेकंद ते तापवून घ्या, केसांच्या मुळांवर लावा. एरंडेल तेलात जास्त प्रमाणात प्रथिने असतात जे केस गळतीस प्रतिबंधित करतात आणि मोहरीच्या तेलात असलेले झिंक, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि सेलेनियम केसांना चमकदार बनवण्यात सहाय्य करतात. केसांना योग्य पोषण मिळाल्यामुळे केस काळे राहतात.

नायजेला बियाणे (कलोंजी) आणि ऑलिव्ह तेल

नायजेला बियाणे (कलोंजी) आणि ऑलिव्ह तेल प्राचीन काळापासून, नायजेला बियाणे आणि ऑलिव्ह तेल यांचे मिश्रण केसांच्या उपचारासाठी वापरले जाते. हे केवळ केस काळे ठेवण्यासच मदत करत नाही तर केसांना आवश्यक पोषण देखिल देते.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - केस गळणे

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: September 16, 2020, 2:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading