ऐतिहासिक ठिकाणी भटकंती करताना लक्षात ठेवा 'या' 5 गोष्टी

ऐतिहासिक ठिकाणी भटकंती करताना लक्षात ठेवा 'या' 5 गोष्टी

वीर देशभक्तांच्या शौर्यगाथांमुळे ऐतिहासिक ठिकाणं आपल्याला नेहमी प्रेरणा देतात.

  • Share this:

मुंबई, 24 मे : अनेकांना ऐतिहासिक ठिकाणांना आणि वास्तूंना भेट देण्याची आवड असते. ही ठिकाणं आपल्या इतिहासाचे साक्षीदार असतात. वीर देशभक्तांच्या शौर्यगाथांमुळे अशी ठिकाणं आपल्याला नेहमी प्रेरणा देतात. अशा ठिकाणी भटकंती करताना काही गोष्टी तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात. यामुळे तुमच्या भटकंतीचा अनुभव सुखद ठरू शकतो.

1 - तुम्ही निवडलेल्या ऐतिहासिक ठिकाणांची माहिती करून घ्या. इंटरनेटमुळे आज हे एका क्लिकवर शक्य झालं आहे. व्हर्च्युअली तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पोहोचता. पुस्तकांमधूनही संबंधित ठिकाणांविषयी तुम्हाला जाणून घेता येईल.

उन्हाळ्याच्या सुट्टीचे काही दिवस राहिले आहेत; रिलॅक्स होण्यासाठी जा 'या' 5 हिल स्टेशनवर

2 - ऐतिहासिक स्थानी जाण्याआधी तिथलं वातावरण कसं आहे हे सुद्धा जाणून घ्या. उन्हाळ्यात फिरताना सुती आणि मोकळे कपडे घालून फिरा. यामुळे तुम्हाला उष्णतेचा फार त्रास होणार नाही. संबंधित ठिकाणाच्या वातावरणाची जर तुम्हाला माहिती असेल तर फिरण्याचा आनंद आणखी द्विगुणित होतो.

3 - प्राचीन ठेवा, ऐतिहासिक वास्तूंची जपणूक करायला हवी. त्यामुळे तिथल्या पर्यटकांच्या नियमांविषयी माहिती करून घ्या.

उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठे गेला नसाल, तर हे आहे सर्वांत कूल डेस्टिनेशन

4 - अशा ठिकाणी फिरताना गाईडची गरज भासली तर जरूर घ्या. ऐतिहासिक ठिकाणी नुसतं फिरण्यापेक्षा तिथली माहिती योग्य व्यक्तीकडून जाणून घेतली तर तुमच्या ज्ञानात आणखी भर पडते.

5 - ऐतिहासिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अतिशय चोख असते. त्यामुळे त्यांचं पालन करा. अशा ठिकाणी फिरायला जाताना जास्त सामान सोबत नेऊ नका.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: travels
First Published: May 25, 2019 07:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading