पाऊस, गरमी आणि प्रदूषणापासून वाचायचं असेल तर या ठिकाणी नक्कीच जा

चिखल, घाण या सर्व गोष्टींना तुम्ही वैतागला असाल तर तुमच्यासाठी आम्ही काही उत्तम पर्याय आणले आहेत.

  • Share this:

एकीकडे मुंबई आणि त्याच्या आसपासच्या परिसरात तुफान पाऊस पडत आहे. पावसामुळे ट्रेन, बस सगळ्यालाच उशीर होतो. नेहमीचा चिखल, घाण या सर्व गोष्टींना तुम्ही वैतागला असाल तर तुमच्यासाठी आम्ही काही उत्तम पर्याय आणले आहेत. मुंबईत काही दिवस तुफान पाऊस पडतो तर काही दिवस कडक ऊनही असतं. या ऊन- पावसाच्या खेळातून थोडं बाजूला जायचं असेल तर एकदा या पर्यायांचा विचार करायला काहीच हरकत नाही.

कौसानी- या जागेला महात्मा गांधींनी भारत का स्वीर्त्झलंड अशी उपमा दिली होती. देशातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी हे एक ठिकाण आहे. उत्तराखंडमध्ये पावसाळ्यात अनेक पर्यटक या ठिकाणाला आवर्जुन भेट देतात. उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यात हे ठिकाण येतं. इथलं सामान्य तापमान हे 10 ते 14 डिग्री एवढं असतं.

पावसाळ्यात नंदा देवी येथील सूर्योदय, चहाचे मळे, आदि कैलाश आणि बागेश्वरपासून सुंदरधुंगा ही ठिकाणं पाहायला विसरू नका. याशिवाय ग्वालदाम या गावालाही भेट देता येईल. येथील सफरचंदाच्या बागा, बैजनाथ मंदीर, गुंहा आणि सुमित्रानंदन पंत संग्रहालयाला नक्की भेट देता येईल.

चेरापूंजी- हे स्थळ पावसाळ्यासाठीच प्रसिद्ध आहे. इथला पाऊस पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. इथलं सर्वसामान्य तापमान हे 12 ते 16 डिग्री एवढं असतं. फिरण्यासाठी इथे रूट पुल, खासी हिल्स, गुहां अशी अनेक ठिकाणं आहेत. गुवाहाटी हे सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्ट आहे. इथून 181 किमीचा प्रवास करून चेरापुंजीला जाता येतं.

राणीखेत- जमिनीपासून जवळपास 6 हजार फुटांच्या उंचीवर असलेलं रानीखेत हे पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. घनदाट जंगल, निसर्ग रम्य परिसर या सगळ्याच्याच तुम्ही प्रेमात पडाल. इथले गोल्फ मैदान, झूला देवी मंदिर, नौकुचिया ताल, बालू बांध अशा अनेक ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता. पंतनगर हे जवळचं एअरपोर्ट आहे. पंतनगर ते राणीखेतचं अंतर 110 किमी आहे. याशिवाय काठगोदाम हे जवळचं रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशन ते राणीखेतचं अंतर 75 किमी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 13, 2019 08:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...