सोलो ट्रीपला जाण्यासाठी ही 4 ठिकाणी आहेत सगळ्यात भारी!

काळासोबत फॅमिली ट्रीप मागे पडल्या असून आता सगळीकडे सोलो ट्रीपचा ट्रेंड सुरू झाला.

News18 Lokmat | Updated On: Jul 25, 2019 08:40 AM IST

सोलो ट्रीपला जाण्यासाठी ही 4 ठिकाणी आहेत सगळ्यात भारी!

मुंबई, 24 जुलै : काही वर्षांपूर्वी लोक आपल्या कुटुंबासोबत फिरायला जात असत. पण त्यासाठी सर्वांना मुलांच्या सुट्ट्यांपर्यंत वाट पाहावी लागत असे. पण काळासोबत हे सर्व मागे पडलं आणि सोलो ट्रीपचा ट्रेंड सुरू झाला. आता ना लोक फिरायला जाताना सर्वांना घेऊन जात आणि सुट्ट्यांची वाटही पाहत नाहीत. त्यापेक्षा सर्वजण आजकाल सोलो ट्रीपचा पर्याय निवडतात. यामध्ये तुम्हाला एक वेगळाच अनुभव मिळतो. तुम्ही सुद्धा सोलो ट्रीपचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही चार ठिकाणं खूप चांगला पर्याय ठरु शकतात.

बाली

इंडोनेशियामधील बाली बेट खूपच सुंदर पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. या ठिकाणी खवय्यांना वेगवेगळे पदार्थांची मेजवानी मिळते. हे फक्त हनीमून डेस्टिनेशनच नाही तर सोलो ट्रीपसाठीही उत्तम पर्याय आहे.

(मालदीवच्या किनाऱ्यावर सिक्स पॅक अ‍ॅब्ज दाखवणाऱ्या मंदिराचे हॉट फोटो झाले व्हायरल)

कोवलम

Loading...

केरळमधील कोवलमला किनाऱ्यांचं शहर म्हटलं जातं. इथलं निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखं आहे. इथं तुमच्यासाठी तुमच्या बजेटच्या सोलो ट्रीप उपलब्ध आहेत. हाउसबोटचा पर्याय सुद्धा याठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहे. याशिवाय लाइटहाउस बीच, कोवलम बीच, हावा हे प्रसिद्ध बीच सुद्धा पाहता येतील.

(जोडीदाराशी सतत वाद होतात? मग 'हे' बोलणं आणि 'ते' शब्द कटाक्षानं टाळा...)

सिक्किम 

सोलो ट्रीपसाठी सध्या सिक्कीम हे एक चांगलं डेस्टिनेशन ठरत आहे. सिक्कीमचं निसर्ग सौंदर्य विशेष उल्लेखनीय आहे. बर्फाळ डोंगरांनी झाकलेली शहरं आणि तलाव हे इथलं वैशिष्ट्य आहे.

पॉन्डिचेरी

जर तुम्हाला भारतात राहून परदेशात जाण्याचा अनुभाव घ्यायचा असेल तर तुम्ही पॉन्डेचरी नक्कीच ट्राय करायला हवं. सोलो ट्रीपसाठी हा अक चांगला पर्याय ठरू शकतो. याठिकाणी गर्दी आणि प्रदूषण नसल्यानं तुम्हाला खूप फ्रेश वाटतं. तसेच हे डेस्टिनेशन फारसं महागडं सुद्धा नाही. याठिकाणी अगदी माफक दरात राहण्या-खाण्याच्या सोई उपलब्ध आहेत.

(पाहा PHOTO : डायबेटिसपासून दूर राहायचंय? मग ट्राय करा ब्रेकफास्टचे हे 10 पर्याय)

===================================================================

VIDEO: आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा बरसला, सखल भागांत साचलं पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2019 08:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...