मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

...अन् Caffeine powder ठरली 'विष'! Supplement drink पिताच तरुणाचा मृत्यू

...अन् Caffeine powder ठरली 'विष'! Supplement drink पिताच तरुणाचा मृत्यू

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Shutterstock)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Shutterstock)

कॅफिन पावडर मिसळून तयार केलेलं सप्लिमेंट ड्रिंक पिताच त्याच्या तोंडातून फेस आला.

  • Published by:  Priya Lad

लंडन, 04 मार्च : हल्ली बरेच तरुण बॉडी बनवण्यासाठी सप्लिमेंट ड्रिंक पितात. पण सप्लिमेंट ड्रिंक बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पावडरचंही एक ठरलेलं प्रमाण असतं आणि ते प्रमाणापेक्षा जास्त झालं तर जीवघेणं ठरू शकतं. ब्रिटनमधील एका तरुणासाठीही सप्लिमेंट ड्रिंकसाठी वापरली जाणार कॅफिन पावडर विष ठरली (Man died due to overdose of Caffeine powder). त्याची एक छोटीशी चूक त्याच्या जीवावर बेतली.

वेल्समध्ये राहणारा 29 वर्षांचा थॉमस मॅन्सफिल्ड एक पर्सनल ट्रेनर होतो. तो सिक्युरिटी गार्डचंही काम करत होता. सप्लिमेंट ड्रिंक बनवण्यासाठी त्याने त्यामध्ये कॅफिन पावडर मिसळली. त्यानंतर त्याच्या तोंडातून फेस आला. त्याच्या पत्नीने त्याला पाहिलं आणि तिने शेजाऱ्यांकडे मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण ड़ॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केलं.

ही घटना 5 जानेवारी 2021 ला घटली. पण तपास समितीने केलेल्या तपासात ही बाब समोर आली आहे. त्याने प्लिमेंट्री ड्रिंकमध्ये चुकून प्रमाणापेक्षा 7 पट जास्त कॅफिन पावडर मिसळली.

हे वाचा - Shocking! डोळ्याच्या सर्जरीचा भयंकर परिणाम; महिलेच्या डोक्यावर उगवली शिंगं

दिवसातून दोन वेळा फक्त 60 ते 300 मिलीग्राम कॅफिन पावडर घेण्याचा सल्ला दिला जातो. थॉमसच्या डिजीटल स्केलची रिडिंग 2 ग्रॅमपासून सरू होत होतं. मात्रेतच कॅफिन घ्यायचं होतं. पण त्याने चूक केली आणि तो 5 ग्रॅम पावडर टाकलेलं ड्रिंक प्यायला. यामुळे त्याचं ड्रिंक 200 कप कॉफीइतकं स्ट्राँग झाला होता आणि त्याचा मृत्यू झाला, असं तपास समितीने सांगितलं.

थॉमसचं पोस्टमॉर्टेम झालं. त्यामध्ये त्याच्या रक्तात प्रति लीटर 392 मिलीग्रॅम कॅफिन पावडर असल्याचं आढळलं. हे प्रमाण 200 कप कॉफी पिण्याइतकं आहे. रक्तात प्रति लीटर 78 मिलिग्रॅम किंवा त्यापेक्षा जास्त कॅफन पाव़र झाल्यास व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

हे वाचा - कान आहेत की रबर! खेचून खेचून महिलेने कानाचं काय केलं पाहा PHOTO

डेली मेलच्या रिपोर्टनुसार तपास समितीच्या समीक्षकांनी कॅफिन पावडरच्या ब्रँडशीही चर्चा केली. त्यांनी आपल्या पॅकसोबत पावडर मोजण्याचं स्कूप आणि इन्स्ट्रक्शन शीट देणार असल्याचं सांगितलं.

First published:

Tags: Food, Health, Lifestyle