• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • Indian Railway: रात्री 11.55 वाजता स्टेशनवर येणारी गाडी 12 नंतर निघत असेल तर कोणत्या तारखेचं तिकिट काढणं योग्य?

Indian Railway: रात्री 11.55 वाजता स्टेशनवर येणारी गाडी 12 नंतर निघत असेल तर कोणत्या तारखेचं तिकिट काढणं योग्य?

तुम्ही आतापर्यंत कितीही वेळा रेल्वेचा प्रवास केला असला; तरी कित्येक वेळा बदललेल्या नियमांमुळे (Train ticket booking rules) गोंधळाची परिस्थिती निर्माण होते...

  • Share this:
मुंबई, 19 ऑगस्ट: आता हळूहळू देश अनलॉक होत असताना, मोठ्या प्रमाणात रेल्वे गाड्याही (Trains running) सुरू होत आहेत. यामुळे लोक कामानिमित्त, किंवा फिरण्यासाठी म्हणूनही रेल्वेचा प्रवास करताना दिसून येत आहे. तुम्ही आतापर्यंत कितीही वेळा रेल्वेचा प्रवास केला असला; तरी कित्येक वेळा बदललेल्या नियमांमुळे (Train ticket booking rules), किंवा अन्य काही गोष्टींमुळे तुम्ही गोंधळात पडू शकता. त्यामुळेच, अशा वेळी काय करायचं (Train ticket booking tips) याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत. रेल्वे मंत्रालयाने तिकिटं काढण्यासंबंधीच्या नियमांमध्ये नुकतेच काही बदल केले आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती वाचा. भारतीय रेल्वेचं जाळं खूप मोठं आहे. प्रवाशांना रेल्वेची तिकिटे काढता यावीत यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी अनेक वेगवेगळे नियम (Train Ticket Booking Rules) आहेत, आणि याच नियमांनुसार रेल्वे तिकिटांचे बुकिंग केले जाते. रेल्वे तिकीट बुकिंग (Train Ticket Booking) संदर्भात असाच एक प्रश्न अनेक प्रवाशांना गोंधळात टाकतो. तो म्हणजे, जर एखादी रेल्वे रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी स्टेशनवर येत असेल (Train arrival), आणि 12 वाजून पाच मिनिटांनी तिथून निघत (Train Departure) असेल तर प्रवाशांनी नेमकं कुठल्या तारखेचं तिकीट घेतलं पाहिजे? अशा वेळी काय करायचं याबाबत तुम्हाला आम्ही या बातमीत सांगणार आहोत. हे वाचा-भंगार विकून केली 391 कोटींची कमाई, Indian Railway ची कोरोना काळात झाली चांदी! रेल्वेच्या नियमांनुसार, ज्या तारखेला गाडी स्टेशनवरून निघणार असेल त्या तारखेचं तिकीट ग्राह्य (Book ticket according to departure time) धरलं जातं. त्यामुळे प्रवाशांनी गाडी सुटण्याची वेळ आणि ती तारीख लक्षात घेऊन तिकीट बुक करावं. हे वाचा-घरात लावलेल्या झाडांमुळेही मिळते Positive Energy; गुलाब, चमेली लावून तर बघा मूळ स्टेशनवर रेल्वे येण्याची वेळ (Arrival time) आणि तारीख (Arrival date) दोन्हीही रेल्वेच्या वेळापत्रकात (Train Time Table) नोंदवलेली नसते. फक्त गाडी स्टेशनवरून निघण्याची वेळ (Departure time) आणि तारीख (Departure date) नमूद असते. त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकात दाखवल्याप्रमाणे गाडी निघण्याच्या तारखेनुसार बुकिंग केले जाते.अशा अनेक गाड्या आहेत ज्या कॅलेंडरनुसार आदल्या तारखेला स्टेशनवर येतात आणि दुसऱ्या तारखेला म्हणजे दुसऱ्या दिवशी स्टेशनवरून निघतात. अनेकदा छोटे-छोटे नियम गोंधळात टाकतात. पण त्याबाबत स्पष्टता आली की आपणही निर्धास्तपणे प्रवास करू शकतो. कधीकधी आपल्या अज्ञानाचा गैरफायदाही घतेला जाऊ शकतो.
First published: