मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /आता रेल्वेतही मिळणार विमानासारखी सुविधा; तुमच्या सेवेत असणार Train Hostess

आता रेल्वेतही मिळणार विमानासारखी सुविधा; तुमच्या सेवेत असणार Train Hostess

विमानांत ज्याप्रमाणे हवाई सुंदरी अर्थात एअर होस्टेस असतात, त्याप्रमाणे ट्रेनमध्ये आता रेल्वेसुंदरी अर्थात ‘ट्रेन होस्टेस’ नेमल्या जाऊ शकतात.

विमानांत ज्याप्रमाणे हवाई सुंदरी अर्थात एअर होस्टेस असतात, त्याप्रमाणे ट्रेनमध्ये आता रेल्वेसुंदरी अर्थात ‘ट्रेन होस्टेस’ नेमल्या जाऊ शकतात.

विमानांत ज्याप्रमाणे हवाई सुंदरी अर्थात एअर होस्टेस असतात, त्याप्रमाणे ट्रेनमध्ये आता रेल्वेसुंदरी अर्थात ‘ट्रेन होस्टेस’ नेमल्या जाऊ शकतात.

  नवी दिल्ली, 10 डिसेंबर : भारतात रेल्वेनं (Indian Railway) प्रवास करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. अजूनही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अनेक जण रेल्वेलाच पसंती देतात. तरीही रेल्वेमध्ये अनेक गैरसोयी आहेत आणि त्या टाळण्यासाठी ज्यांना शक्य असेल, ते अनेक जण विमानप्रवास करतात. जास्तीत जास्त प्रवासी रेल्वेकडे आकर्षित व्हावेत यासाठी अधिकाधिक सुविधा देण्याचा रेल्वेचा विचार आहे. त्यामुळे अनेक बदल केले जाण्याचे संकेत मिळत आहेत. विमानांत ज्याप्रमाणे हवाई सुंदरी अर्थात एअर होस्टेस असतात, त्याप्रमाणे ट्रेनमध्ये आता रेल्वेसुंदरी अर्थात ‘ट्रेन होस्टेस’ नेमल्या जाऊ शकतात, अशी माहिती आहे.

  ट्रेनच्या प्रीमियम क्लासमध्ये ट्रेन होस्टेस नेमल्या जाऊ शकतात. विशेष म्हणजे महिला ट्रेन होस्टेसबरोबरच (Train Hostess) पुरुष ट्रेन होस्टेसही नेमले जाणार आहेत. प्रवाशांना चांगली सेवा देणं हा यामागचा मुख्य हेतू आहे. प्रवाशांना चढण्या-उतरण्यासाठी मदत करणं, खाण्याचे पदार्थ, पाणी प्रवाशांना त्यांच्या जागी नेऊन देणं ही कामं हे ट्रेन होस्टेस करतील, अशी माहिती IRCTC च्या अधिकाऱ्यांनी ‘टीव्ही 9 हिंदी’ला दिली आहे.

  हे वाचा - लोअर, मिडल की अपर बर्थ, विंडो सीटवर बसण्याचा अधिकृत मान कुणाचा?

  ट्रेनच्या प्रत्येक डब्यात एक महिला आणि एक पुरुष ट्रेन होस्टेस नेमण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ट्रेन होस्टेसची ही सेवा सगळ्या ट्रेनमध्ये उपलब्ध नसेल. कमी वेळाच्या आणि छोट्या प्रवासाच्या प्रीमियम ट्रेनमध्येच ही सेवा उपलब्ध असेल. म्हणजेच 12 ते 18 तासांचा प्रवास असणाऱ्या विशेष ट्रेनमध्येच ही सेवा उपलब्ध असेल. लांब पल्ल्याच्या विशेष ट्रेन्स म्हणजे राजधानी एक्सप्रेस, दुरांतो एक्सप्रेसमध्ये या सेवा देण्यात येणार नाहीत. शताब्दी, गतिमान आणि तेजस अशा 25 ट्रेन्समध्ये होस्टेस असतील, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यांना योग्य प्रशिक्षणही दिलं जाणार आहे, जेणेकरून सेवेचा दर्जा चांगला राखला जाईल. उत्तमरीत्या प्रशिक्षित होस्टेसनाच कामावर नेमण्यात येणार आहे.

  हे वाचा - महिलांना रेल्वेत मिळणार ‘ही’ खास सुविधा; जाणून घ्या अधिक माहिती

  रेल्वेच्या या काही विशेष उपक्रमांमबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. आतापर्यंत जे उपक्रम राबवण्यात आले, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता विमानासारखीच सेवा उपलब्ध करून दिल्यास आणखी प्रवासी रेल्वेकडे आकर्षित होतील, असं IRCTC च्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. प्रवाशांना सर्व सेवा देण्याबरोबरच त्यांच्याशी संवाद साधण्याचं महत्त्वाचं कामही ट्रेन होस्टेस करतील. त्यामुळे काही कारणांमुळे छोट्या प्रवासासाठी विमानातून प्रवास करणारे रेल्वे प्रवासाकडे नक्की वळतील अशी अपेक्षा आहे.

  First published:

  Tags: India, Indian railway, Lifestyle, Railway