'माउंट एव्हरेस्ट'वर लागलाय 'ट्रॅफिक जाम'; 200 हून अधिक गिर्यारोहक खोळंबले

'माउंट एव्हरेस्ट'वर लागलाय 'ट्रॅफिक जाम'; 200 हून अधिक गिर्यारोहक खोळंबले

चढाई मार्गावर लागल्या गिर्यारोहकांच्या लांबच लांब रांगा

  • Share this:

नवी दिल्ली, 23 मे - जगातलं सर्वात ऊंच शिखर 'माउंट एव्हरेस्ट'वर ट्रॅफिक जामची समस्या निर्माण झाली आहे. हिमालय टाइम्सच्या वृत्तानुसार, 8848 मीटर ऊंच हे शिखर चढण्यासाठी इथल्या 4 नंबरच्या बेस कॅम्पमध्ये थांबलेल्या 200 हून अधिक देश-विदेशी गिर्यारोहकांना अनेक तास थांबून रहावं लागलं. 'एव्हरेस्ट'च्या चढाई मार्गावर झालेल्या गिर्यारोहकांच्या गर्दीमुळे याठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याठिकाणी निर्माण झालेल्या एकंदर परिस्थितीमुळे अनेक गिर्यारोहकांनी तक्रारीसुद्धा दाखल केल्या.

PUBG चा नाद खुळा; या नादापायी हिने चक्क नवऱ्याला मागितला घटस्फोट

माउंट एव्हरेस्टवर चढाई करायची असेल तर नेपाळ मार्गाने जावं लागतं. नेपाळ सरकारने 14 मे पासूनच गिर्यारोहकांसाठी हा मार्ग खुला केला. दरम्यान, एव्हरेस्ट सर करण्यासाठी निघालेल्या पहिल्या टीममधले 8 गिर्यारोहक शिखरावर जाऊन पोहोचले. नेपाळ पर्यटन विभागाच्या माहितीनुसार 1953 मध्ये एडमंड हिलेरी आणि शेरपा तेंजिंग नॉर्गे या दोघानंतर आत्तापर्यंत 4400 गिर्यारोहकांनी 'माउंट एव्हरेस्ट'वर चढाई केली.

उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठे गेला नसाल, तर हे आहे सर्वांत कूल डेस्टिनेशन

इथल्या शिबीरातील पर्यटन मंत्रालयाच्या संपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ''बुधवारी माउंट एव्हरेस्टवर चढणाऱ्या 200 हून अधिक गिर्यारोहकांना ट्राफिक जामचा सामना करावा लागला. खराब हवामानामुळे याआधी शिखर सर करण्यासाठी निघालेल्या गिर्यारोहकांना चढाई मार्गावरच थांबून रहावं लागलं. बुधवारी ते टोकावर पोहोचले खरे, पण ते किती जण आहेत हे अद्याप स्पष्ट झालं नाही. शिखरावर पोहोचलेले अनेक गिर्यारोहक बेस कॅम्पला परतले असले तरी आणखी किती जण परतायचे आहेत याची आकडेवारी लवकरच कळेल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. यंदा 381 गिर्यारोहकांना परमिट जारी करण्यात आलं असून त्यापैकी 44 जण त्यांचं प्रतिनिधित्व करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

First published: May 23, 2019, 11:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading