फक्त शारीरिक नाही तर मानसिक आरोग्याची काळजी घ्या; Mental health साठी उपयुक्त 4 वनौषधी

फक्त शारीरिक नाही तर मानसिक आरोग्याची काळजी घ्या; Mental health साठी उपयुक्त 4 वनौषधी

काही वनौषधी तुमचं मानसिक स्वास्थ राखण्यासाठी खूप फायद्याच्या ठरतील.

  • Last Updated: Dec 13, 2020 07:22 AM IST
  • Share this:

मानसिक आरोग्याकडे (mental health) आपल्या देशात दुर्लक्ष होतं आहे. एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्याकडे  लक्ष जात नाही, जे गंभीर असू शकतं. मात्र सध्या लोक मानसिक स्वास्थ्याविषयी खुलेपणानं बोलू लागले आहेत. त्यावर मोकळेपणानं चर्चा करत आहेत आणि त्याकडे लक्षही देऊ लागले आहेत. myupchar.com च म्सशी संबंधित डॉ. उमर अफरोज म्हणाले की, अनेक लोकांना वेळोवेळी मानसिक स्वास्थ्याच्या समस्या निर्माण होतात पण त्यांचं मानसिक आजारात रूपांतर तेव्हा होतं जेव्हा त्याची लक्षणं तणाव निर्माण करतात आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रभाव टाकू लागतात. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या मानसिक आणि भावनिक अस्वस्थता कमी करण्यास मदत करतात, तसंच काही वनौषधी पण आहेत ज्या मानसिक स्वास्थ्यासाठी खूप कामाच्या सिद्ध होऊ शकतात.

अश्वगंधा : अश्वगंधा यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. अनेक अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, अश्वगंधा तणाव आणि अस्वस्थता या लक्षणांवर काम करते आणि ते लक्षण कमी करते. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, प्राण्यावर केलेल्या अभ्यासात अश्वगंधामुळे तणावाचं प्रमाण लक्षणीय प्रमाणात कमी झालं होतं. अभ्यासात असंही दिसून आलं की अश्वगंधा घेतल्याने उंदरांच्या मेंदूत केमिकल सिग्नल पोहोचल्याने तणाव राहिला नाही. काही मनुष्यांवर तपासण्या केल्यावर असं दिसून आलं की,  अश्वगंधा घेण्यानं तणाव आणि चिंता या समस्या खूप कमी झाल्या. अश्वगंधाचे सेवन गोळ्या किंवा पातळ औषधाच्या रुपात केलं जाऊ शकतं.

हे वाचा - तुमच्यामध्ये iodine ची कमी तर नाही ना? शरीर देतंय 5 संकेत

पुदीना : पुदिनादेखील प्रभावी वनौषधी आहे. त्याचा उपयोग जेवणात आणि पेय पदार्थात केला जातो. त्याच्या सेवनानं अस्वस्थता कमी होते. ते शरीर आणि मनावर थंड आणि शांत प्रभाव पाडते. याचं मुख्य कारण म्हणजे त्यात मेन्थॉल असते. पुदीना तणाव मुक्त करतो आणि सोबत मानसिक थकवा पण दूर करतो. पुदीन्याचे तेल म्हणजेच पेपरमिंट ऑइलपण लाभदायक ठरते. जर तणाव वाटत असेल तर रुमालावर पुदिन्याच्या तेलाचे काही थेंब टाकून ते सुंघावे त्याने बरे वाटते.

कॅमोमाइल : कॅमोमाइल पण त्या वनौषधीपैकी आहे जी अस्वथतेची भावना दूर करते. ह्याचे फूल तणाव दूर करण्यात मदत करते. काही लोकांना कॅमोमाइलची एलर्जी होऊ शकते. म्हणून आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. कॅमोमाइलचा चहा शरीरात सेरोटोनिन आणि मेलाटोनिन यांची पातळी वाढवण्यात सहाय्यक ठरतो, ज्याने तणाव आणि चिंता दूर होतात.

हे वाचा - केसांमधील उवांमुळे हैराण झाला आहात? घरच्या घरी तयार करा हे रामबाण औषध

लवेंडर : लवेंडर अनेक गुण असलेली वनौषधी आहे. त्याच्या तेलात फूल आणि गवताचा सुगंध असतो, जो मन आणि शरीराला आराम देतो त्याने ताजेतवाने वाटते. चिंता आणि पॅनिक अटॅक कमी होण्यात मदत होते. त्याने डोक्यात चिंता वाढवणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येते. लवेंडर तेलात टेरपेनस लिनालूल आणि लिनालिल एसीटेट नावाची रसायने असतात, जी मेंदूतील केमिकल रिसेप्टर्सवर एक शांत प्रभाव टाकत असतात. चहामध्ये लवेंडरचा उपयोग केला जाऊ शकतो, किंवा लवेंडर तेलाचे काही थेंब आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान केले जाऊ शकते.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - मानसिक आजार: लक्षणे, कारणे, उपचार...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: December 13, 2020, 7:22 AM IST

ताज्या बातम्या