सूरत, 25 डिसेंबर : गुजरातच्या (Gujarat) सूरतमध्ये (Surat) मध्ये छापेमारी करण्यासाठी गेलेल्या केंद्रीय जीएसटी अधिकाऱ्यासोबत छापेमारी करण्यासाठी गेलेल्या जीएसटी अधिकाऱ्यांसोबत असं काही झालं की ते सरळ रुग्णालयात भरती झाले आहे. सेंट्रल जीएसटी अधिकारी अमित शर्मा अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत चौक बाजार परिसरात छापेमारी करण्यासाठी गेले. येथे अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांची जीएसटी चेक करण्यास सुरुवात केली. मात्र जेव्हा जीएसटी पाहण्यासाठी व्यापाऱ्याने सहयोग केला नाही, तर तेथे मारहाण झाली. आणि त्यातच व्यापाऱ्याने अधिकाऱ्याचं हाताला कडकडून चावला.
हे पाहून अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनादेखील धक्का बसला. ज्यानंतर अन्य जीएसटी कर्मचाऱ्यांनी व्यापाऱ्याचे हात आणि पाय पकडून कारमध्ये बसवलं. अधिकाऱ्यांच्या उजव्या हातावर चावण्याचा निशाण पाहून डॉक्टरही हैराण झाले. जीएसटी अधिकारी आणि व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या या मारहाण आणि चावण्याचा व्हिडीओदेखील समोर आला आहे.
हे ही वाचा-CCTV : इंंडिकेटर न देताच गाडी वळवली; Activa वरुन येणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू
ज्या व्यापाऱ्याने अधिकाऱ्याचा हात चावला, त्याचं नाव सूफियान मोहम्मद असल्याचे सांगितलं जात आहे. त्याने ज्या अधिकाऱ्याचा हात चावला त्यांचं नाव अमित शर्मा असल्याचं सांगितलं जात आहे. हात चावल्याच्या घटनेनंतर अधिकाऱ्याला सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र जेव्हा मीडियातील सदस्यांनी अमित शर्मा यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यास नकार दिला.