मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Weekend Trip: वीकेंड सुंदर करणारी पुण्याजवळची 5 ठिकाणं माहिती आहेत का?

Weekend Trip: वीकेंड सुंदर करणारी पुण्याजवळची 5 ठिकाणं माहिती आहेत का?

Weekend Trip: रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून फ्रेश होण्यासाठी विकेंड ट्रिप काढायची असेल तर पुण्याजवळची 5 ठिकाणं तुमच्या सोयीची आहेत.

Weekend Trip: रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून फ्रेश होण्यासाठी विकेंड ट्रिप काढायची असेल तर पुण्याजवळची 5 ठिकाणं तुमच्या सोयीची आहेत.

Weekend Trip: रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून फ्रेश होण्यासाठी विकेंड ट्रिप काढायची असेल तर पुण्याजवळची 5 ठिकाणं तुमच्या सोयीची आहेत.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Pune, India

   पुणे, 28 जानेवारी :   विद्येचं माहेरघर असलेलं पुणे हे सह्याद्रीत वसलेलं शहर आहे. हे शहर आणि परिसर निसर्गरम्य आहे. तिथे तुम्ही वीकेंड छान व्यतीत करू शकता. खंडाळा ते माळशेज घाटापर्यंत अशी पुण्याजवळची काही ठिकाणं आहेत, जिथे तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात मनसोक्त फिरू शकता. अशाच काही ठिकाणांबद्दल जाणून घेऊ या. या संदर्भात माहिती देणारं वृत्त 'इंडियन एक्स्प्रेस'ने दिलं आहे.

  मुळशी : पावसाळ्यात पुण्याजवळच्या रोड ट्रिपसाठी एक सुंदर ठिकाण म्हणजे मुळशी हे आहे. ताम्हिणी घाटातून तिथे जाता येतं. पावसाळ्यात ताम्हिणी घाट परिसर हिरवा शालू पांघरून घेतो. जेव्हा आकाशाचा निळा, धुक्याचा पांढरा आणि झाडांचा हिरवा रंग एकत्र येतो, तेव्हा ते दृश्य डोळ्यांना सुखावणारं असतं. इथे पर्यटक मुळशी धरणाच्या बॅकवॉटरच्या किनारी शांतता अनुभवू शकतात. अंधारबन ट्रेल पॉइंट, कैलासगड किल्ला, कोराईगड आणि धनगड किल्ले इथून जवळ आहेत. त्यामुळे तिथे ट्रेकिंग करता येतं. हे ठिकाण पुण्याच्या चांदणी चौकापासून 65 किलोमीटर अंतरावर आहे.

  पवना तलाव : मुळशीप्रमाणेच पवना तलाव रोड ट्रिपसाठी उत्तम ठिकाण आहे. इथे रात्रभर कॅम्पिंगचे अनेक पर्यायदेखील उपलब्ध आहेत. इथे कोणीही हिरव्या गवतावर झोपून पाण्याच्या प्रवाहाच्या शांत खळखळाटाचा आनंद घेऊ शकतो. तोरणा, तुंग आणि लोहगड किल्ल्यावरून हा तलाव दिसतो. हा तलाव 1970च्या दशकातला आहे. पवना धरण बांधल्यावर या जलाशयाचं तलावात रूपांतर झालं. हे ठिकाण पुण्याच्या चांदणी चौकापासून 42 किलोमीटर अंतरावर आहे.

  आयुष्यात वडापाव नाही खाल्ला तर काय खाल्लं! मुंबई-पुण्यातील बेस्ट 10 वडापाव चुकूनही मिस करू नका!

  माळशेज : माळशेज घाट पुण्याच्या जवळपासच्या डोंगररांगामध्ये आहे. हा घाट महाबळेश्वर आणि माथेरानसारख्या हिल स्टेशन्सच्या बरोबरीने हळूहळू प्रसिद्ध होत आहे. पावसाळ्यानंतरचा हिवाळा या घाटाला धुक्याच्या दाट थराने झाकून टाकतो. हे ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनत आहे. इथे पर्यटकांना अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी एमटीडीसी आणि वन विभागाने घाट परिसरात विकासकामं हाती घेतली आहेत. माळशेज घाट पुण्यातल्या चांदणी चौकापासून 132 किलोमीटर अंतरावर आहे.

  ठोसेघर : ठोसेघर धबधब्याची सहल आठवडाभराचा ताणतणाव घालवण्यासाठी आणि नव्या आठवड्याची उत्साहाने सुरुवात करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. हे ठिकाण पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यात आहे. इथे पर्यटक छोटा आणि मोठा असे दोन्ही प्रकारचे धबधबे पाहू शकतात. जुलै ते ऑक्टोबर हा या ठिकाणी भेट देण्याचा सर्वोत्तम काळ असतो. परंतु हिवाळ्यात, दाट धुक्यातही हे धबधबे सुंदर दिसतात. हे ठिकाण पुण्यातल्या चांदणी चौकापासून 136 किलोमीटरवर आहे.

  सेल्फी काढण्यासंदर्भात गोवा प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय, मजा-मस्ती येईल अंगाशी

  खंडाळा : लोणावळा आणि खंडाळा या हिलस्टेशन्सना न गेलेला पुणेकर सापडणं कठीण आहे. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटीपासून 622 मीटर (2,041 फूट) उंचीवर असलेल्या लोणावळ्याचा रस्ता पावसाळ्यात डोळ्यांना सुखावणारा असतो. लोणावळा हे नाव‘लोणावळी’ या संस्कृत शब्दावरून आलं आहे. ते लोणावळ्याच्या जवळ असलेल्या कार्ला लेणी, भाजे लेणी आणि बेडसा लेणी यांसारख्या अनेक लेण्यांसाठी वापरलं जातं. लोणावळा आणि खंडाळ्याची ट्रिप कार्ला, भाजे आणि बेडसा लेणी (गुंफा) आणि लोहगड व विसापूर या दोन किल्ल्यांना भेट देऊन एकत्र केली जाऊ शकते. हे ठिकाण पुण्याच्या चांदणी चौकापासून 67 किलोमीटर अंतरावर आहे.

  First published:

  Tags: Lifestyle, Pune, Travel