Home /News /lifestyle /

आठवड्यात 55 तासांपेक्षा जास्त काम केलंत तर जीवावर बेतेल, Work from Home बाबत WHOचा धक्कादायक खुलासा

आठवड्यात 55 तासांपेक्षा जास्त काम केलंत तर जीवावर बेतेल, Work from Home बाबत WHOचा धक्कादायक खुलासा

'करावं लागतं', असं म्हणत लेट नाईट बसून रोज काम करत असाल तर आधी हे वाचा... Work from Home करणाऱ्यांचा सर्व्हे झाला आहे आणि WHOने त्यासंबंधी सांगितलेली आकडेवारी धक्कादायक आहे.

नवी दिल्ली, 17 मे: गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे वर्क फ्रॉम होम (Work from Home) करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर बरीच ऑफिसेस पुन्हा सुरू झाली होती. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा सर्व बंद झालंय. तसंच गेल्या दीड वर्षांपासून घरूनच काम करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मात्र, घरून काम करणाऱ्यांनी आठवड्याला 55 तासांपेक्षा जास्त काम केल्यास त्यांचा जीव जाऊ शकतो,असा धक्कादायक खुलासा जागतिक आरोग्य संघटनेनं केला आहे. नवभारत टाईम्सने याबाबत वृत्त दिलं आहे. ऑफिसमध्ये 6 ते 9 तास काम करणारे कर्मचारी गेल्या वर्षभरापासून वर्क फ्रॉम होममध्ये जास्त वेळ काम (Extra hour work) करताहेत. बऱ्याच जणांच्या डबल शिफ्ट देखील होत आहेत. अशातच जास्त वेळ काम करणं तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतं, असा इशाराWHOने दिलाय. संशोधकांनी केलेल्या एका शोधात समोर आलंय की,लाखो लोकांचे मृत्यू जास्त वेळ काम केल्यामुळे होत आहेत.WHOने याबाबत एक डेटा जाहीर केलाय आणि सांगितलं की,कामाच्या तासांपेक्षा जास्त काम केल्यामुळे अनेक लोकांचे जीव जात आहेत. कोरोनाकाळात याचं प्रमाण वाढल्याचंही म्हटलं गेलंय. याचं मुख्य कारण वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये तणाव वाढणं आहे,असंही WHOने सांगितलंय. जास्त वेळ काम करणाऱ्यांच्या जीवनशैलीबद्दल एनव्हायरमेंट इंटरनॅशनल जर्नलमध्ये (International Journal of Environment) पहिला शोधनिबंध पब्लिश झालाय. त्यानुसार, 2016 मध्ये जास्त काम केल्यामुळे स्ट्रोक (stroke)आणि हृदयविकाराच्या (heart attack) धक्क्याने मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढली होती. ही संख्या त्यावेळी7लाख45हजार होती. ही संख्या वर्ष 2000च्या तुलनेत30टक्के जास्त होती. एका झटक्यात होईल Mood चांगला; हे 11 हेल्दी पदार्थ एकदा खाऊन तर बघा! WHOचे पर्यावरण, जलवायु परिवर्तन आणि आरोग्य विभागाच्या (WHO’s Department of Environment, Climate Change and Health) संचालक मारिया नीरा (Maria Neira) यांनी सांगितलं की, 'एका रिसर्चनुसार, दर आठवड्याला 55 तास किंवा त्यापेक्षा जास्त काम केल्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे या शोधनिबंधाच्या माहितीच्या आधारे आम्हाला जास्त वेळ काम करणाऱ्या लोकांचा जीव वाचवायचा आहे. हा शोध तब्बल 194 देशातून आकडेवारी गोळा करून करण्यात आला आहे. यासाठी 2000 ते 2016 पर्यंत डेटा गोळा करण्यात आला होता. आठवड्याला 35-40 तास काम करणाऱ्यांच्या तुलनेत 55 तास काम करणाऱ्यांपैकी 35 टक्के लोकांना स्ट्रोक आला, तर त्यापैकी 17 टक्के लोकांचा जीव धोक्यात होता,असंही म्हटलंय. जास्त वेळ काम करण्याचे प्रमाण चीन, जपान आणि ऑस्ट्रेलियात सर्वाधिक आहे. तसेच मृत्यू पावलेले सर्वाधिक लोक हे दक्षिण पूर्व एशिया आणि पश्चिमी प्रशांत क्षेत्रातील आहेत. Immunity वाढवण्यासाठी करा योग; ही आसनं रक्तदाबातही फायदेशीर, पाहा VIDEO WHO ने आठवड्यात 55 तासांपेक्षा जास्त काम करण्याच्या पद्धतीत बदल करण्याची गरज व्यक्त केलीए. तसंच WHOचे प्रमुख टेडॉस एडनॉम घेब्रेसियस यांनी म्हटलंय की साथीच्या या काळात जवळपास 9 टक्के लोक जास्त काम करताहेत, त्यामुळे स्ट्रोकमुळे होणारे मृत्यचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांनी जास्त वेळ काम करणं टाळावं.
First published:

Tags: Health, Lifestyle, Who, Work from home

पुढील बातम्या