अशा पद्धतीने व्यायाम केला तर कमी होऊ शकतो स्पर्म काउंट

महिलांमध्ये अमीनोरियाची समस्या निर्माण होते. यात महिलांना जवळपास तीन महिने मासिक पाळी येत नाही.

News18 Lokmat | Updated On: Aug 14, 2019 08:39 PM IST

अशा पद्धतीने व्यायाम केला तर कमी होऊ शकतो स्पर्म काउंट

Side Effects Of Excess Exercise: निरोगी आणि सुदृढ आरोग्यासाठी अनेकजण नियमित व्यायाम करतात. व्यायामाची सवय ज्यांना असते त्यांचं शरीर आणि मन हे इतरांच्या तुलनेत चांगलं असतं. याशिवाय झोपही चांगली येते.

काही लोक याच सर्व गोष्टी लक्षात ठेवून अतिरिक्त व्यायाम करतात. नेमकी हीच गोष्ट शरीरासाठी घातक आहे. याचा नकारात्मक परिणाम शरीरावर होतो. नवभारत टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अतिरिक्त व्यायाम केल्यामुळे इनफर्टिलिटीची समस्या उद्भवू शकते.

दररोज गरजेपेक्षा जास्त व्यायाम केल्यास वंध्यत्वची समस्या होऊ शकते. महिलांमध्ये अमीनोरियाची समस्या निर्माण होते. यात महिलांना जवळपास तीन महिने मासिक पाळी येत नाही.

नियमित जीमला जाणाऱ्या अनेक महिला या शरीराला जेवढ्या कॅलरीची गरज असते तेवढ्याही कॅलरी आहारातून घेत नाहीत. याचा थेट परिणाम प्रेग्नंसीवर होतो. यासोबत शारीरिक संबंधांमधली रुचीवरही नकारात्मक परिणाम होतो.

याशिवाय लठ्ठ महिलांमध्ये एस्ट्रोजन हार्मोन मोठ्या प्रमाणात तयार होतं. या हार्मोनचा अंडाशयात तयार होणाऱ्या EGGS वर आणि मासिक पाळीवर परिणाम होतो. हेही एक वंध्यत्वाचं कारण आहे. जर शरीरात एस्ट्रोजन हार्मोनचा स्तर संतुलित नसेल तर प्रेग्नन्सीमध्ये अडचणी येतात.

Loading...

याचपद्धतीने पुरुषांनी गरजेपेक्षा जास्त व्यायाम केला तर त्यांचा स्पर्म काउंट कमी होऊ शकतो. हेही एक वंध्यत्वाचं कारण असू शकतं. लठ्ठपणामुळे अनेकजण दररोज गरजेपेक्षा जास्त तास व्यायाम करतात.

तासन् तास व्यायाम करताना याचा शरीरावर काही नकारात्मक परिणाम तर होणार नाही ना याचा विचार करत नाहीत. त्यामुळे जिमला जाण्यापूर्वी आणि तिथे व्यायाम करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 14, 2019 08:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...