Home /News /lifestyle /

Relationship Tips: अति काळजी करणंही बरं नव्हं; चांगल्या नात्यांवर असा होत जातो परिणाम

Relationship Tips: अति काळजी करणंही बरं नव्हं; चांगल्या नात्यांवर असा होत जातो परिणाम

अनेकदा लोक जास्त प्रेम आणि काळजीमुळं अशा अनेक गोष्टी करतात, ज्याच्यामुळं त्यांच्या जोडीदाराला त्याची स्पेस मिळत नाही, ज्याची त्याला गरज असते. स्पेस न दिल्यानं नंतर नात्यात कटुता येऊन भांडणं सुरू होतात.

    नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी : पती-पत्नी किंवा प्रियकर-प्रेयसी यांच्यात प्रेम आणि परस्पर सामंजस्य असेल तर नात्यात दुरावा निर्माण होत नाही. नातेसंबंधात एकमेकांची काळजी घेणं (care in relation) देखील महत्त्वाचं असतं. जर जोडीदार एकमेकांची काळजी घेत नसतील तर, नात्यात समस्या येतात. जेव्हा नातं नवीन असतं, तेव्हा सर्वच दण केवळ त्यांचे सकारात्मक पैलूच (Problems in relationship) समोर आणतात. परंतु, कालांतरानं अशा अनेक गोष्टी समोर येऊ लागतात, ज्या एकमेकांना पसंत पडणाऱ्या नसतात. कधीकधी जास्त काळजी घेणं देखील नात्यामध्ये समस्यांचं कारण बनू शकतं. टीव्ही 9 ने दिलेल्या बातमीनुसार, जोडीदारावर जास्त प्रेम करण्याच्या नादात अति काळजी घेणं, छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करणं यासारख्या अनेक चुका लोक करतात. हे त्यांच्या नात्यासाठी चांगलं नसतं. आज अशाच काही चुकांबद्दल जाणून घेऊ. जोडीदाराचे निर्णय तुम्ही घेऊ नका बरेच लोक त्यांच्या नात्यात जोडीदाराला स्वतःवर इतके अवलंबून करून ठेवतात की, ते त्यांना कोणताही निर्णय घेऊ देत नाहीत. या चुकीमुळं, तुमचा जोडीदार सर्वसामान्य स्थितीत काय नाईलाजाच्या परिस्थितीतही निर्णय घेऊ शकत नाही. यामुळं तुम्हालाही नुकसानही सहन करावं लागू शकतं. कारण, निर्णय घेण्याची क्षमता जोडीदारामध्ये तयार होत नाही आणि कधीकधी अशीही परिस्थिती समोर येऊ शकते, की तो असहाय्य वाटू शकतो. तेव्हा भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी जोडीदाराला निर्णय घेण्याची संधी आणि स्वातंत्र्य द्या. जास्त काळजी घेणं प्रेम आणि काळजी दोन्ही कोणत्याही नात्यात ताकद म्हणून काम करतात. परंतु, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानीकारक ठरतो. जर तुम्ही तुमच्या जोडीदारावर खूप प्रेम करता आणि त्यामुळं त्याची जास्त काळजी घेण्याचा तुमचा स्वभाव बनला असेल तर, लक्षात घ्या की, एक दिवस याच्यामुळं तुमच्या नात्यात नकारात्मका येऊ शकते. जास्त काळजी घेतल्यानं जोडीदार एखाद्या वेळी चिडचिडाही होतो. हे वाचा - Protein Rich Diet: यासाठी आहारात डाळी असायलाच हव्यात; निरोगी, फिट आरोग्याचं गुपित जोडीदाराला स्पेस न देणं अनेकदा लोक जास्त प्रेम आणि काळजीमुळं अशा अनेक गोष्टी करतात, ज्याच्यामुळं त्यांच्या जोडीदाराला त्याची स्पेस मिळत नाही, ज्याची त्याला गरज असते. स्पेस न दिल्यानं नंतर नात्यात कटुता येऊन भांडणं सुरू होतात. कोणत्याही नात्यातील गोष्टींचा समतोल राखण्यासाठी एकमेकांना स्पेस देणं फार महत्त्वाचं मानलं जातं. एकमेकांना स्पेस दिल्यानं जोडीदारांमध्ये सामंजस्य राहतं आणि त्यामुळं नात्यात गोडवाही राहतो. हे वाचा - Cold Water : पाणी पिताना अनेकजण ही एक चूक करतात; नंतर अनेक आरोग्य समस्या मागे लागतात प्रत्येक बाबतीत अडथळा आणणं किंवा टोकणं किंवा वर्चस्व गाजवणं नात्यातील प्रेम आणि काळजी या बाबतीत लोक वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात, असंही अनेकदा दिसून आलं आहे. ते त्यांचे निर्णय आणि इतर बाबी जोडीदारावर लादण्यास सुरुवात करतात. त्यांना हे देखील कळत नाही की, ते त्यांच्या जोडीदाराला चुकीची वागणूक देत आहेत. कधीकधी ते अशा गोष्टी जाणीवपूर्वकही करत असतात. या स्वभावामुळं ते अनेकदा त्यांच्या जोडीदाराची अडवणूक करणं, त्याला टोकणं अशा गोष्टी करतात. असं केल्यानं जोडीदार खट्टू होतो आणि त्याची चिडचिड होते. तसंच, नात्यात कडवटपणाचं वातावरणही निर्माण होतं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Relation, Relationship tips

    पुढील बातम्या