S M L

आज रात्री असं दिसेल शतकातील सर्वात मोठं खग्रास चंद्रग्रहण

या शतकातील सर्वात मोठं खग्रास चंद्रग्रहण आज सर्वांना पाहता येणार आहे. 1 तास दीड मिनिटे इतकी चंद्राची खग्रास अवस्था असेल.

Updated On: Jul 27, 2018 10:34 AM IST

आज रात्री असं दिसेल शतकातील सर्वात मोठं खग्रास चंद्रग्रहण

मुंबई, 27 जुलै : या शतकातील सर्वात मोठं खग्रास चंद्रग्रहण आज सर्वांना पाहता येणार आहे. 1 तास दीड मिनिटे इतकी चंद्राची खग्रास अवस्था असेल. आज रात्री 10 वाजून 45 मिनिटांनी हे ग्रहन सुरू होईल. त्यामुळे आज रात्री पृथ्वीच्या सावल्यांचा खेळ पहायला मिळणार आहे. १ वाजता संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत असेल. २ वाजून ४३ मिनिटांनी खग्रास स्थिती संपून चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडण्यास सुरुवात होईल. ३ वाजून ३९ मिनिटांनी चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडल्याने ग्रहण सुटेल. याकडे सर्वच खगोलप्रेमींच लक्ष असणार आहे. या काळात चंद्र हा पृथ्वीपासून दूर जाणार असून त्याचा वेग नेहमीपेक्षा मंदावणार आहे. त्यामुळे हे शतकातील मोठं ग्रहण असणार आहे.  दिल्ली, पुणे, मुंबई यासह अनेक शहरांतून हे चंद्रग्रहण दिसणार आहे.

मराठा आरक्षणासाठी आमदारांचे राजीनामे खरे की स्टंटबाजी ? हे आहे सत्य

या शतकातील सर्वात मोठं खग्रास चंद्रगहन उद्या (27 जुलै) रोजी सर्वांना पाहता येणार आहे. 1 तास दीड मिनिटे इतकी चंद्राची खग्रास अवस्था असणार असून शुक्रवारी रात्री 10.45 मिनिटांनी हे ग्रहण सुरु होणार आहे. अशी माहिती खगोल शास्त्रज्ञ प्रकाश तुपे यांनी लोकमतला दिली. उद्या रात्री पृथ्वीच्या सावल्यांचा खेळ सर्वांना पाहायला मिळणार आहे. पृथ्वीच्या सावलीतून चंद्र पूर्णपणे जात असल्याने या ग्रहणाला खग्रास चंद्रगहन म्हंटले जाते.

या काळात चंद्र हा पृथ्वीपासून दूर जाणार असून त्याचा वेग नेहमीपेक्षा मंदावणार आहे. त्यामुळे यंदाचे ग्रहण हे या शतकातील मोठे ग्रहण असणार आहे. हे ग्रहण दुर्बिणीशिवाय पाहता येणार आहे.

‘ही’ मराठमोळी अभिनेत्री बॉलिवूड अभिनेत्रींना देऊ शकते टक्कर

Loading...
Loading...

खग्रास चंद्रग्रहणाचे वैशिष्ट्य

- 'सारोस' चक्रातील 129 वं ग्रहण

- 1 तास दीड मिनिटं राहणार चंद्राची खग्रास अवस्था

- शुक्रवारी रात्री 10 वाजून 45 मिनिटांनी ग्रहण

- 3 तास 55 मिनिटं  ग्रहणाचा कालावधी

- 9 जून 2123 मध्ये पुन्हा असं ग्रहण

संपूर्ण भारतातून ग्रहणाच्या सर्व स्थिती पाहता येतील

- युरोप, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण अमेरिकेत हे ग्रहण पाहायला मिळणार

हेही वाचा...

नवी मुंबईत बंददरम्यान जखमी झालेल्या एकाचा मृत्यू

गुवाहाटीत आढळला 'उलट्या' काळजाचा माणूस, डाॅक्टरही हैराण

VIDEO : औरंगाबादमध्ये जुनाट इमारत कोसळली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 27, 2018 10:34 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close