रोजच्या जेवणातला पदार्थ आहे फार कामाचा! टोमॅटोचे हे 5 फायदे तुम्हाला माहीत नसतील

रोजच्या जेवणातला पदार्थ आहे फार कामाचा! टोमॅटोचे हे 5 फायदे तुम्हाला माहीत नसतील

टोमॅटोचा वापर आपण रोजच्या जेवणात करतोच. पण तुम्हाला हे माहीत आहे का? दररोज टोमॅटो खाल्याने पाच प्रकारच्या कर्करोगापासून तुम्ही दूर राहू शकता. जाणून घ्या काय आहेत टोमॅटोचे अनेक फायदे.

  • Share this:

टोमॅटोमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे हाडं मजबूत होतात. टोमॅटोत लायग्‍कोपीन नावाचं अँटी ऑक्सिडेंट असतं. त्‍यामुळे हाडांमघील मांस टिकून राहण्यास मदत होते. रोजच्या आहारात न चुकता टोमॅटोचा समावेश करा.

टोमॅटोमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे हाडं मजबूत होतात. टोमॅटोत लायग्‍कोपीन नावाचं अँटी ऑक्सिडेंट असतं. त्‍यामुळे हाडांमधील मांस टिकून राहण्यास मदत होते. रोजच्या आहारात न चुकता टोमॅटोचा समावेश करा.

टोमॅटो खाल्‍याने प्रोटेस्‍ट ग्रंथींच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. त्याचसोबत महिलांमध्ये होणारा ओव्हेरियन कर्करोग, पोटाचा आणि फुप्फुसाचा कर्करोग यांचाही धोका कमी होतो. टोमॅटोमधील लायकोपेन अँटी ऑक्सिडंट कर्करोगाच्या पेशी कमी करतं.

एका अभ्यासात अशी माहिती समोर आली आहे, मधूमेह असलेल्या लोकांनी 30 दिवस आपल्या आहारात टोमॅटोचा समावेश केल्यास रक्तातील लिपीड पेरॉक्सिडेशनचं प्रमाण कमी होतं. त्याने हृदयाशी निगडीत आजार कमी होण्यास मदत होते.

एका अभ्यासात अशी माहिती समोर आली आहे, मधुमेह असलेल्या लोकांनी सलग 30 दिवस आपल्या आहारात टोमॅटोचा समावेश केल्यास रक्तातील लिपीड पेरॉक्सिडेशनचं प्रमाण कमी होतं. त्याने हृदयाशी निगडीत आजार कमी होण्यास मदत होते.

उच्च रक्‍तदाब असणाऱ्यांनी आपल्‍या रोजच्या आहारात टोमॅटोचा जास्‍तीत जास्‍त वापर करावा. त्यामध्ये असणाऱ्या पोटॅशियममुळे हायपरटेन्शन आणि उच्च रक्तदाब या समस्या कमी होण्यास मदत होते.

उच्च रक्‍तदाब असणाऱ्यांनी आपल्‍या रोजच्या आहारात टोमॅटोचा जास्‍तीत जास्‍त वापर करावा. त्यामध्ये असणाऱ्या पोटॅशियममुळे हायपरटेन्शन आणि उच्च रक्तदाब या समस्या कमी होण्यास मदत होते.

डोळ्याशी निगडीत समस्याही टोमॅटोनं कमी होण्यास मदत होते. त्यामधील व्हिटॅमिन ए आणि सी कमी दिसणे, रातआंधळेपणावर फायदेशीर ठरतं. तसेच मोतिबिंदू असलेल्‍या रूग्‍णांनी रोजच्या आहारात टोमॅटोचा वापर केल्‍यास आराम मिळतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 21, 2019 06:22 AM IST

ताज्या बातम्या