टोकियो, 19 जुलै : 23 जुलै, 2021 रोजी टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) सुरू होत आहे. ही स्पर्धा सुरू होण्यासाठी एक आठवड्यापेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. कित्येक देशांचे खेळाडू यासाठी जपामध्ये पोहोचले आहे. पण हा खेळ सुरू होण्याआधी चर्चेत आहे ते अँटी सेक्स बेड (Anti Sex Bed). खेळाडूंसाठी इथ अँटी सेक्स बेड्स देण्यात आले आहेत.
ऑलिम्पिक खेळाडूसाठी असलेल्या अँटी सेक्स बेड्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता हे बेड्स नेमके आहेत तरी कसे आणि का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
ऑलिम्पिक खेळादरम्यान खेळाडू मैदानात जशी आपली पूर्ण ताकद पणाला लावतात तसेच ते त्यानंतर आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत रोमान्ससुद्धा करतात. पण सध्या कोरोनाचा धोका आणि सोशल डिस्टन्सिंग लक्षात घेत ऑलिम्पिक खेळात पुरेपूर खबरदारी घेतली जात आहे आणि तसेच नियम तयार केले जात आहे. त्याचाच एक भाग आहेत हे अँटी सेक्स बेड्स.
हे वाचा - पृथ्वी शॉच्या खेळीवर कथित गर्लफ्रेंड खूश, आनंदामध्ये दिली 'ही' प्रतिक्रिया
ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना या अँटी सेक्स बेड्सवरच झोपावं लागेल. आता याचं वैशिष्ट्य तर याच्या नावातच आहे अँटी सेक्स म्हणजे सेक्स बेड्सच म्हणजे यावर सेक्स करता येणार नाही.
हे बेड्सच कार्डबोर्डपासून तयार करण्यात आले आहेत. त्याचा आकारही असा आहे की त्यावर फक्त एकच व्यक्ती झोपू शकते आणि त्याचा भार पेलण्याचीच क्षमता या बेडमध्ये आहे. त्यावर दोन लोक झोपूच शकत नाही. जास्तीत जास्त 200 किलो वजनच हा पेलू शकतो. कोणत्याही प्रकारचा धक्का या बेडला लागता कामा नये. दोन लोक झोपले आणि बेडवर दाब वाढला तर बेड तुटू शकतो.
या बेडची रचना पाहून खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. खेळाडूंच्या मते हा बेड आकाराने खूपच लहान आहे आणि तो त्यांचा भारही पेलू शकत नाही. त्यामुळे या बेडवर आक्षेप घेतला जातो आहे.
हे वाचा - खरंच तुम्ही खात असलेल्या Cadbury Chocolate मध्ये Beef आहे?
ऑलिम्पिक खेळाच्या आयोजकांनी याआधी 1.5 लाखपेक्षा जास्त कंडोम वाटपातंही लक्ष्य ठेवलं होतं. पण यावरून वाद सुरू झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Olympic, Olympics 2021, Sports