मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Olympic Village मधील बेड्स खरंच Anti sex beds आहेत? खेळाडूने दाखवला लाइव्ह डेमो

Olympic Village मधील बेड्स खरंच Anti sex beds आहेत? खेळाडूने दाखवला लाइव्ह डेमो

Tokyo Olympic 2021 : ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी खास अँटी सेक्स बेड्स (Anti sex beds) तयार करण्यात आले आहेत. जे सर्वात जास्त चर्चेत आहेत.

Tokyo Olympic 2021 : ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी खास अँटी सेक्स बेड्स (Anti sex beds) तयार करण्यात आले आहेत. जे सर्वात जास्त चर्चेत आहेत.

Tokyo Olympic 2021 : ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी खास अँटी सेक्स बेड्स (Anti sex beds) तयार करण्यात आले आहेत. जे सर्वात जास्त चर्चेत आहेत.

  • Published by:  Priya Lad

टोकियो, 20 जुलै : अवघ्या काही दिवसांवर ऑलिम्पिक (Olympic 2021) स्पर्धा येऊन ठेपली आहे. पण ही स्पर्धा, त्यात सहभागी होणारे खेळाडू आणि त्यांचा सराव यापेक्षा सर्वात जास्त चर्चेत आहेत ते ऑलिम्पिक व्हिलेजमधील (Olympic Village 2021) अँटी सेक्स बेड्स (Anti sex beds). ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी हे खास बेड्स (Tokyo Olympic Village Beds) तयार करण्यात आले आहेत. यामुळे बहुतेक खेळाडूही नाराज आहेत. पण खरंच हे बेड्स अँटी सेक्स आहेत का? याबाबत आता खेळाडूनेच माहिती दिली आहे.

आयरिश जिम्नॅस्ट रायस मॅक क्लेनघनने (Irish gymnast Rhys McClenaghan) अँटीसेक्स बेड्सचा व्हिडीओ तयार केला आहे. या बेड्सचा त्याने लाइव्ह डेमो दिला आहे. हा व्हिडीओ त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना या अँटी सेक्स बेड्सवरच झोपावं लागेल. आता याचं वैशिष्ट्य तर याच्या नावातच आहे अँटी सेक्स म्हणजे सेक्स बेड्सच म्हणजे यावर सेक्स करता येणार नाही.

हे वाचा - कोरोना लस घेतल्यानंतर 5 तासांतच मारला लकवा! आता डोळाही बंद होईना

हे बेड्सच कार्डबोर्डपासून तयार करण्यात आले आहेत. त्याचा आकारही असा आहे की त्यावर फक्त एकच व्यक्ती झोपू शकते आणि त्याचा भार पेलण्याचीच क्षमता या बेडमध्ये आहे. त्यावर दोन लोक झोपूच शकत नाही. जास्तीत जास्त 200 किलो वजनच हा पेलू शकतो. कोणत्याही प्रकारचा धक्का या बेडला लागता कामा नये. दोन लोक झोपले आणि बेडवर दाब वाढला तर बेड तुटू शकतो. या बेडची रचना पाहून खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. खेळाडूंच्या मते हा बेड आकाराने खूपच लहान आहे आणि तो त्यांचा भारही पेलू शकत नाही. यावर झोपही लागणार नाही आणि त्याचा परिणाम खेळावर होईल, असं सांगत अनेक खेळाडूंनी या बेडवर आक्षेप घेतला जातो आहे.

हे वाचा - जगातली सगळ्यात फिट महिला टिया क्लेयर टूमी; ‘हे’ आहे तिचं फिटनेस Secret

पण या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता हा खेळाडू या बेड्सवर जोरात उड्या मारताना दिसतो आहे. पण बेड्सला काहीही होत नाही आहे. याचा अर्थ हे बेड्सच मजबूत आहेत. त्यामुळे बेड्सबाबत पसरत असलेली माहिती ही अफवा आहे, असा पुरावा या खेळाडूने दिला आहे.

First published:

Tags: Lifestyle, Olympic, Olympics 2021, Sex