मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /नीरज चोप्राची ‘फॅट-टू-फिट’ जर्नी तुम्हालाही करेल इन्स्पायर

नीरज चोप्राची ‘फॅट-टू-फिट’ जर्नी तुम्हालाही करेल इन्स्पायर

वयाच्या 12 व्या वर्षी नीरजचं वजन हे तब्बल 90 किलो एवढं होतं.

वयाच्या 12 व्या वर्षी नीरजचं वजन हे तब्बल 90 किलो एवढं होतं.

वयाच्या 12 व्या वर्षी नीरजचं वजन हे तब्बल 90 किलो एवढं होतं.

  मुंबई, 11 ऑगस्ट- नीरज चोप्राने (Neeraj Chopra) टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) सुवर्णपदक जिंकले. नीरजने जागतिक स्तरावर असे काम करून दाखवले की, ज्यामुळे देशातील प्रत्येकाची छाती अभिमानाने फुलली. पण तुम्हाला माहीत आहे का, नीरजचा 'देसी बॉय' (Desi Boy) ते 'गोल्डन बॉय' (Golden Boy) हा प्रवास सोपा नव्हता. भारतासाठी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्राचा ‘फॅट-टू-फिट’ (Fat-to-Fit) पर्यंतचा प्रेरणादायी प्रवासाची गोष्ट (Motivational Story) जाणून घेऊयात.

  हरियाणाच्या पानिपत (Panipat in Haryana) मधील खांदरा (Khandra Village) हे नीरजचं गाव आहे. नीरज चोप्राची खेळातील चपळता आणि तंदुरुस्ती पाहिल्यानंतर कोणालाही विश्वास बसणार नाही की, एकेकाळी नीरज हा लठ्ठ (Fit Body) होता. वयाच्या 12 व्या वर्षी नीरजचं वजन हे तब्बल 90 किलो एवढं होतं. जे त्याच्या वयाच्या मानाने खूप जास्त हहोतं. तेव्हा तो रोज तूप, लोणी आणि मलई खात असे. पण या गोष्टी पचवण्यासाठी व्यायाम करत नव्हता. वजन वाढल्यामुळे त्याच्या घरातील लोक त्याच्या आरोग्याबद्दल चिंता करू लागले. त्याचे वडील आणि काकांनी त्याला पानिपतच्या जिम आणि स्पोर्ट्स स्टेडियम (Gymnasium and Sports Stadium) येथे नेण्याचा निर्णय घेतला. येथूनच नीरजच्या आयुष्यात एक नवीन वळण आलं. तिथे असताना, व्यायाम आणि खेळांमध्ये तो भाग घेऊ लागला. इथेच तो जेवलिन थ्रो स्पोर्ट्स (Javelin Throw Sports) अर्थात भालाफेक या खेळाच्या प्रेमात पडला. नियमित व्यायाम, योग्य प्रमाणात पोषण आहार (Right Nutrition in Right Portion) आणि आपल्या शरीराच्या तंदरुस्तीला महत्त्व देणं यामुळे नीरजने आपल्या क्रीडा आयुष्यातील अनेक टप्पे गाठले.

  (हे वाचा: का साजरा केला जातो 'मोहरम'?; जाणून घ्या इस्लामिक कॅलेंडरचं महत्त्व)

  न्यूज 18 ला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, जेव्हा नीरजला विचारण्यात आलं की, लहान मुलं तुमच्याकडे प्रेरक व्यक्तिमत्त्व म्हणून बघत आहेत. या मुलांना तुम्ही काय संदेश द्याल? तेव्हा नीरजने उत्तर दिले की, 'मी मुलांना एवढेच सांगेन की कठोर परिश्रम करा आणि त्यांना आवडणारे खेळ खेळा. कठोर परिश्रमाने आपण काहीही साध्य करू शकता.' फक्त मुलेच नाहीत, नीरज आता बॉलिवूड सेलिब्रिटींना (Bollywood Celebrities) देखील प्रेरणा देत आहे. नुकतेच अर्जुन कपूरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर (Arjun Kapoor on Instagram Story) गोल्डन बॉय नीरजच्या (Golden Boy Neeraj) लठ्ठपणाविरुद्धच्या लढाईचा (Battle against obesity) उल्लेख करून त्याचे कौतुक केलं आहे. त्याचबरोबर त्याने असंही म्हटले की, नीरज त्याच्यासाठी आणि देशासाठी प्रेरणास्थान (Inspiration) आहे. नीरजच्या फॅट-टू-फिट प्रवासाबद्दलही अर्जुन कपूरने उल्लेख केला आहे.

  (हे वाचा:‘ही’ आहे दुपारच्या जेवणाची योग्य वेळ; प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्टही देतात हाच सल्ला  )

  23 वर्षीय नीरजने आपल्या खेळासाठी जीवनशैली बदलताना मौज मस्ती करणं थांबवलं आहे, असं अजिबात नाही. तर, नीरजचे असे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहू शकता ज्यात तो आनंदानं आयुष्य जगताना आणि नाचताना दिसत आहे. नीरजचं क्रीडा करिअर प्रेरक आहेच पण त्याचं खासगी आयुष्यही सगळ्यांसाठीच प्रेरक आहे.

  First published:
  top videos

   Tags: Fitness, Lifestyle