मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /प्रेमीयुगुलांना नको ते धाडस महागात पडणार, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

प्रेमीयुगुलांना नको ते धाडस महागात पडणार, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

12 राशींसाठी आजचा दिवस कसा आहे पाहा

12 राशींसाठी आजचा दिवस कसा आहे पाहा

12 राशींसाठी आजचा दिवस कसा आहे पाहा

12 राशींसाठी आजचा दिवस कसा आहे पाहा

मेष- आज महत्त्वाची कामं करण्यामध्ये काही अडथळे निर्माण होऊ शकतात. मात्र चिकाटीने ती कामं पूर्ण करण्यावर भर द्यायला हवा. शत्रूंपासून सावधान रहा.

वृषभ- कामाच्या अधिक ताणामुळे थकवा जाणवू शकतो. बेसावधपणे काम करू नका जबाबदारीनं आणि समजूदारपणाने काम पूर्ण केल्यास आजचा दिवस तुम्हाला फायदा मिळवून देणारा असेल. मित्र परिवाराकडून सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल. आप्त स्वकीयांच्या भेटीगाठी होतील.

मिथुन- कला आणि छंद जोपासल्यानं आजचा दिवस प्रसन्न जाणार आहे. जुने मित्र-मैत्रीणी भेटण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात कुरबुरी होऊ नयेत यासाठी विशेष काळजी घ्य़ा. सकारात्मक दृष्टीकोन राहिल. आवडणाऱ्या व्यक्तींसोबत आजचा दिवस घालवाल.

कर्क- कोणत्याही गोष्टीत अति भावुक झाल्यानं नुकसान होऊ शकतं. नोकरी, शिक्षण करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. आवडणाऱ्या व्यक्तीसोबत वाद होण्याची शक्यता असल्यानं शब्द विचार करून वापरा. सामाजिक समारंभात सहभागी व्हाल.

सिंह- मोठी ऑफऱ मिळण्याचा योग आहे. तुमच्या कामावर वरिष्ठ अधिकारी खूश होतील. शब्दात अडकणार नाही याची विशेष काळजी घ्यायला हवी. जोडीदाराचं कौतुक करण्यात कंजुसी करू नका. त्यामुळे वाद उद्भवण्याचा धोका आहे.

कन्या- नोकरदारांसाठी आजचा दिवस चांगला आहे. लग्नासाठी स्थळ येण्याची शक्याता आहे. किंवा तुम्ही आज प्रेमात पडू शकता. तुमच्या कामात नवीन संधी मिळतील.

तूळ- या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायी ठरेल. नोकरी व्यवसायात भरभराट होईल. सकारात्मक विचार राहातील. तुम्ही प्रेमात पडू शकता. आवडणाऱ्या व्यक्तीसोबत वेळ घालवणं फायद्याचं ठरेल.

वृश्चिक- विद्यार्थी आणि नोकरदारांनी आपले प्रयत्न आणखी चांगल्या पद्धतीनं करावेत. .येणाऱ्या काळात अधिक फायदा होईल. जास्त खर्च होण्य़ाची शक्यता आहे.

धनु- वडीलझाऱ्यांचे आशीर्वाद चांगल्या कामांसाठी फायद्याचे ठरतील. घेतलेल्या निर्णयात समतोल राखाणं महत्त्वाचं ठरेल.

मकर- जोडीदारासोबत वाद होऊ शकतात. जोडीदाराच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करू नका. मनमोकळेपणाने चर्चा करा. पैशांबाबत चिंता सतावत राहिल. विद्यार्थी आणि नोकरदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असेल. जमीन-प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

कुंभ- मोठ्या स्वप्नांच्या दिशेनं वाटचाल कराल. विद्यार्थी आणि राजकारणात असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. मात्र मेहनत करावी लागेल. प्रेम प्रसंगांमध्ये आज कुरबुरी होण्याची शक्यता आहे.

मीन- धीर सोडू नये. कठीण परिस्थिती हळूहळू बदलेल. प्रेम प्रकरणांमध्य़े नको ते धाडस करणं महागात पडेल. कुटुंबाकडून पेचप्रसंगात मदत मिळेल. नोकरदार, व्यावसायिकांना अधिक मेहनत करावी लागले.

(वर दिलेली माहिती ही जोतिष्यशास्त्र आणि पंचागानुसार असून राशीभविष्यात करण्यात आलेल्या दाव्याशी News18Lokmat सहमत असेलच असं नाही.)

First published:
top videos

    Tags: Astrology